ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

केळापूर येथे विदर्भ पटवारी संघ नागपूर–२ उपविभाग शाखेची वार्षिक आमसभा उत्साहात पार; नव्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड

On: March 23, 2026 4:01 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा : अशफाक खान


केळापूर येथील श्री. जगदंबा संस्थान येथे दि.22.3.2026 रोजी दुपारी १२:०० वाजता विदर्भ पटवारी संघ नागपूर–२ उपविभाग शाखा केळापूरची वार्षिक आमसभा उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या सभेचे अध्यक्षस्थान उपविभाग शाखेचे अध्यक्ष श्री. शालिक कनाके यांनी भूषविले.

या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय अध्यक्ष श्री. बाळकृष्णजी गाढवे उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख अतिथी म्हणून भारत पिसे (अध्यक्ष, विदर्भ पटवारी संघ नागपूर–२ जिल्हा शाखा यवतमाळ), श्री. परिमल डोळसकर (उपाध्यक्ष, नागपूर–२ शाखा यवतमाळ) तसेच श्री. चेतन ठाकरे (सचिव, नागपूर–२ शाखा यवतमाळ) यांनी उपस्थित राहून सभेला मोलाचे मार्गदर्शन केले.

सभेची सुरुवात शोक प्रस्ताव मांडून करण्यात आली. त्यानंतर मागील वर्षाच्या सभेचे इतिवृत्त (प्रोसीडिंग) वाचून कायम करण्यात आले. सन २०२५–२०२६ या आर्थिक वर्षातील जमा-खर्च पत्रकास मंजुरी देण्यात आली तसेच आगामी सन २०२६–२०२७ साठीचे अंदाजपत्रक सभेने एकमताने मंजूर केले.

यावेळी पटवारी वर्गाच्या विविध रास्त मागण्या, कामातील अडचणी आणि प्रशासकीय अडथळ्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी यावर ठोस भूमिका मांडत पुढील काळात संघटनेची भूमिका आणि धोरण निश्चित करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच मतदार यादी प्रसिद्ध करण्यासही मान्यता देण्यात आली.

सभेतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे सन २०२६–२०२७ या कालावधीसाठी नव्या कार्यकारिणीची निवड. यासाठी निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिशिर निनावे (मंडळ अधिकारी) यांनी काम पाहिले, तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून मा. श्री. महादेव शिंदे (ग्राम महसूल अधिकारी) यांनी सहकार्य केले.

या निवडणुकीत खालील पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली :
🔺अध्यक्ष : दिपक पवार
🔺उपाध्यक्ष : प्रशांत पानगे
🔺सचिव : प्रितम आडे
🔺सहसचिव : हर्षल मेश्राम
🔺कोषाध्यक्ष : निलम प्रांजळे
नवीन कार्यकारिणीच्या निवडीबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे सभागृहात टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करण्यात आले. तसेच त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन उपाध्यक्ष जगमित्र तुमरे, सचिव दिपक पवार तसेच विदर्भ पटवारी संघ नागपूर–२ उपविभाग शाखा केळापूरच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांच्या सहकार्याने करण्यात आले.
सभेचा समारोप सकारात्मक वातावरणात झाला असून, आगामी काळात पटवारी वर्गाच्या प्रश्नांसाठी संघटना अधिक बळकटपणे काम करेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

लग्नाच्या उंबरठ्यावर दुर्दैवाचा घाला; घोटी येथे अपघातात १५ वर्षीय पुतण्याचा मृत्यू, दोघे जखमी

बुद्ध पौर्णिमा विशेष : पाथरी येथे एक दिवसीय विपश्यना शिबिराचे आयोजन; जुन्या साधकांसाठी सुवर्णसंधी

पाटणबोरीत गोवंशीय जनावरांची मोठी सुटका; दोन दिवसांत दोन कारवाया, ९ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

करंजीत ऑनलाईन क्रिकेट सट्ट्यावर पोलिसांची मोठी कारवाई; ९ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, ₹९६ हजारांचा मुद्देमाल जप्त

पांढरकवडा शहरातील वाहतूक प्रश्न बनला बिकट , वाहतूक ठप्प — शिबला रोडवर सर्वाधिक कोंडी; प्रशासनाचे दुर्लक्ष

उमरी (रोड) येथे शॉर्ट सर्किटमुळे मोबाईल दुकानाला भीषण आग; लाखोंचे नुकसान

Leave a Comment