ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

पांढरकवडा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; दोन पोलीस हवालदारांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव

On: March 24, 2026 12:14 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा — अशफाक खान


महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक सेवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या पांढरकवडा पोलीस स्टेशनच्या दोन पोलीस हवालदारांचा यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या वतीने  आज दि.24 मार्च 2026 रोजी प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे. हरविलेल्या व्यक्तींचा शोध तसेच मुद्देमाल निर्गती मोहिमेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल हा गौरव करण्यात आला.

पांढरकवडा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस हवालदार श्री. उमेश कुमरे (ब. नं. २१९५) हे विशेष पथकात काम करत असून, त्यांनी फेब्रुवारी २०२६ महिन्यात हरविलेल्या व्यक्तींच्या शोध मोहिमेत उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या चिकाटी, तत्परता आणि कर्तव्यपरायणतेमुळे अनेक हरविलेल्या व्यक्तींचा यशस्वी शोध घेण्यात आला. त्यांच्या या कामगिरीमुळे पोलीस दलाबद्दल जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

तसेच, पोलीस हवालदार श्री. गुणवंत मडावी (ब. नं. १२७३) यांनीही विशेष पथकात कार्यरत राहून फेब्रुवारी २०२६ दरम्यान राबविण्यात आलेल्या मुद्देमाल निर्गती मोहिमेत भरीव योगदान दिले. प्रलंबित मुद्देमाल प्रकरणे निकाली काढण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले असून, त्यांच्या कामगिरीमुळे पोलीस स्टेशनच्या कामकाजात गती आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत झाली आहे.

दोन्ही कर्मचाऱ्यांची कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि कार्यतत्परता ही यवतमाळ जिल्हा पोलीस दलासाठी अभिमानाची बाब असल्याचे नमूद करण्यात आले. त्यांच्या उल्लेखनीय सेवेला दाद देत  विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी  श्री.कुमार चिंता  पोलिस अधीक्षक, यवतमाळ  हे हजर होते.

अशा प्रकारच्या सन्मानामुळे पोलीस दलातील इतर कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळते आणि सेवेत अधिक जबाबदारीने कार्य करण्याची भावना निर्माण होते.
पांढरकवडा पोलीस स्टेशनच्या या यशस्वी कामगिरीमुळे यवतमाळ जिल्हा पोलीस दलाची प्रतिमा अधिक उंचावली असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पांढरकवडा पोलिसांची कारवाई : कत्तलीसाठी तेलंगणात नेण्याच्या तयारीतील 12 गोवंशांची सुटका, 8.80 लाखांचा मुद्देमाल जप्त

महावितरणच्या निष्काळजीपणाचा बळी; विजेचा धक्का लागून ३ दुभत्या गायींचा जागीच मृत्यू

मोमीन वेलफेअर फाऊंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; मुंतजीम खान इझहार खानचा जाहीर सत्कार

पांढरकवड्याचे नगराध्यक्ष आतिश उर्फ सोनूभैया बोरेले यांची महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या अमरावती विभाग उपाध्यक्षपदी निवड

ताडउमरीत तलवारींसह दोन गट आमनेसामने; पांढरकवडा पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

मोमिन वेलफेयर फाउंडेशन द्वारा मेधावी विद्यार्थियों का सम्मान समारोह

Leave a Comment