✍️पांढरकवडा : अशफाक खान
केळापूर येथे मंगळवार दि. २४ मार्च २०२६ रोजी श्री. जगदंबा देवस्थान परिसरात माजी मंत्री ॲड. शिवाजीराव मोघे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘स्नेह मिलन’ कार्यक्रम अत्यंत उत्साही आणि भावनिक वातावरणात पार पडला. हा कार्यक्रम केवळ एक औपचारिक मेळावा न राहता, गेल्या चार दशकांपासून साहेबांशी निष्ठेने जोडलेल्या कार्यकर्ते, सहकारी आणि मित्रपरिवाराचा एक जिवंत स्नेहसंमेलन ठरला.
🎯 नात्यांचा स्नेहबंध अधिक दृढ
१९८० पासून मोघे साहेबांच्या राजकीय व सामाजिक प्रवासात खांद्याला खांदा लावून उभे राहिलेल्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. उपस्थित प्रत्येकाने मोघे साहेबांची मनापासून भेट घेत, विविध सामाजिक, राजकीय आणि स्थानिक प्रश्नांवर सखोल चर्चा केली. यावेळी अनेक जुन्या आठवणींना उजाळा देत वातावरणात आपुलकी आणि जिव्हाळा दिसून आला.

🎯 मान्यवरांची उल्लेखनीय उपस्थिती
या भव्य स्नेह मेळाव्याला अनेक दिग्गज आणि मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यामध्ये माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, पांढरकवड्याचे नगराध्यक्ष सोनु बोरेले, जगदंबा संस्थानचे अध्यक्ष शंकर बडे, माजी सभापती (पं.स.) शंकरअण्णा नालमवार, यवतमाळ जिल्हा सरचिटणीस जितेंद्र मोघे, विजय पाटील चालब र्डीकर, माजी नगराध्यक्ष संतोष बोरेले, लक्ष्मणराव बोरले, माजी जि.प. सदस्य प्रकाश मरस्कोल्हे, अमर पाटील, तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रेमभाऊ राठोड, मनोज भोयर, हफीज पोसवाल, गजानन बेजंकीवार, काशीनाथ मिलमिले, संध्यारेड्डी, रमेश भुरे, चंदू पाटील, वामनराव सिडाम, काशिनाथ शिंदे, डच्चू सोखी, विष्णू राठोड, बिषणसिंग शिंदो, सिनुअण्णा नालमवार, माकडे साहेब, मदन जिद्देवार, निमीष मानकर, विजय तेलंगे, खालीकभाई, अनिस पोसवाल, ॲड.गाजी , प्रेमराव वखरे, दिपक कापरतीवार, संतोष राऊत, पाशा सर, शादूर्लसिंग चाहल, अफरोज भाई, डॉ. अजिंक्य चाहल, नागोराव सोनावणे, संजय नाईकवाडे, किशोर भोयर, सतीश कडेवार, प्रेमजीत धोपे, उत्तम परचाके, मोहन चव्हाण आणि श्रीकांत बोडेवार यांसह अनेक मान्यवरांचा समावेश होता.

🎯 नागरी सत्काराने कार्यक्रमाची सांगता
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात श्री. जगदंबा संस्था व विश्वस्त मंडळाच्या वतीने ॲड. शिवाजीराव मोघे यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. त्यांच्या दीर्घकालीन सामाजिक व राजकीय योगदानाचा गौरव करत उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना मानवंदना दिली.
🎯 एकजुटीचे प्रतीक ठरलेले स्नेह मिलन
हा स्नेह मेळावा पांढरकवडा तालुक्यातील कार्यकर्त्यांची एकजूट, परस्परांतील विश्वास आणि मोघे साहेबांवरील जनप्रेम यांचे जिवंत उदाहरण ठरला. भविष्यातील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठीही या मेळाव्याने सकारात्मक दिशा दिल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.








