✍️पांढरकवडा/ अशफाक खान
घटनेची थोडक्यात हकिकत अशी की, मौजा. कृष्णापुर, ता. केळापुर जि. यवततमाळ येथे घटना दिनांक ०८/१२/२०१५ च्या ५ ते ६ महिन्यापुर्वी घटना घडली. आरोपी विकास आनंदराव सुरपाम याने पिडितेवर त्याचे खुप प्रेम आहे असे म्हणून लग्नाचे अमिष दाखवुन अल्पवयीन पिडितेवर वारंवार जबरदस्तीने शारिरिक संबंध प्रस्तापित केले त्यामुळे ति आरोपी पासुन ४ महिन्याची गरोदर असताना अल्पवयीन पिडितेने आरोपीकडे लग्नाची मागणी केली असता आरोपीने लग्न करण्याची टाळाटाळ केली व तुझ्याच्याने काय होते ते करून घे असे धमकविले त्यामुळे अल्पवयीन पिडितेने नाईलाजाने पांढरकवडा पोलिस स्टेशन पांढरकवडा येथे रिपोर्ट दिला व सदरहू रिपोर्टवरून पो.स्टे. पांढरकवडा येथे आरोपी विरूध्द भांदवि चे कलम ३७६ (२) (एन), ५०६, ४१७ सहकलम ६ बालकांचे लैगिंक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२ तरतूदी नुसार गुन्ह्याची नोंद अपराध क. ३३५/२०१५ अन्वये नोंद करण्यात आली व तपास अधिकारी पोलिस उपनिररिक्षक श्री संजीव खंदारे यांनी केला. तपासामध्ये आरोपीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने विशेष न्यायालय केळापूर येथे प्रकरण न्यायप्रविष्ठ केले.
अभियोग पक्षाकडून अतिरिक्त शासकीय अभियोक्ता श्री रमेश डी. मोरे यांनी एकूण ७ महत्वाचे साक्षीदार तपासण्यात आले. वि. विशेष सत्र न्यायालय पांढरकवडा यांनी, पिडिता, वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकारी व इतर परिस्थितीजन्य पुराव्यानिशी अभियोग पक्षाची बाजू ग्राह्य धरून आरोपी यास भांदवि चे कलम ३७६ (२) (एन), ५०६, ४१७ सहकलम ६ बालकांचे लैगिंक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२ मध्ये शिक्षा ठोठावण्यात आली. बालकांचे लैगिंक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२ कलम ६ मध्ये १० वर्षे व रू. ५,०००/- दंड व दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त सश्रम कारावास तसेच भांदवी ४१७ भांदवी मध्ये १ वर्ष सश्रम कारावास व १०००/- रू. दंड व दंड न भरल्यास १५ दिवसाचे अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा तसेच भांदवि चे कलम ५०६ भांदवी मध्ये १ वर्षे सश्रम कारावास व ५००/- रू. दंड व दंड न भरल्यास ८ दिवस अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. कलम ३७६ भांदवि मधील शिक्षेचा समावेश बालकांचे लैगिंक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२ चे कलम ६ मध्ये असून, कलम ४२ प्रमाणे भांदवी चे कलम ३७६ (२) (एन) मध्ये वेगळी शिक्षा देण्यात आली नाही. सर्व शिक्षा एकत्रित रित्या भोगावयाचे आहे. एकुण दंडाची रक्कम रू. ६,५०० हि पिडितेला अथवा तिच्या वारसाला देण्याचा आदेश पारीत झाला. सदरहू शिक्षा (अतिरिक्त सत्र) न्यायाधिश केळापूर श्री. अभिजीत एम. देशमुख साहेब यांचे न्यायालयाने दिनांक. २५/०३/२०२६ रोजी ठोठावली. पैरवि अधिकारी सहायक पो. उपनिरिक्षक मनोहर कुमरे ब.नं. १९७९ यांनी काम पाहिले.








