ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

टिपेश्वरमध्ये दिया मिर्झा यांचा निसर्गसफरीचा अविस्मरणीय अनुभव; ‘4-मार्क’ वाघिणीच्या दर्शनाने व्यक्त केला आनंद

On: March 28, 2026 12:52 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️पांढरकवडा: अशफाक खान


यवतमाळ जिल्ह्यातील निसर्गसंपन्न टिपेश्वर वन्यजीव अभयारण्याला नुकतीच बॉलिवूड अभिनेत्री आणि संयुक्त राष्ट्रांच्या (UN) पर्यावरण सदिच्छा दूत Dia Mirza यांनी भेट देत दोन दिवसांचा संस्मरणीय पर्यटन अनुभव घेतला. त्यांच्या सोबत पती वैभव रेखीही उपस्थित होते.

दि. 27 व 28 मार्च 2026 रोजी झालेल्या या दौऱ्यात दिया मिर्झा यांनी अभयारण्यातील निसर्गसौंदर्य, जैवविविधता आणि वन्यजीवांचे जवळून निरीक्षण केले. सकाळच्या सफारीदरम्यान त्यांना अभयारण्यातील कक्ष क्रमांक 115 मध्ये प्रसिद्ध ‘4-मार्क’ मादी वाघीण तसेच टिपेश्वर तलाव परिसरात ‘डेजी’ (Daisy) या मादी वाघिणीचे दुर्मिळ दर्शन झाले. या रोमांचक क्षणांमुळे त्यांनी विशेष आनंद व्यक्त करत हा अनुभव “अविस्मरणीय” असल्याचे सांगितले.

दिया मिर्झा यांनी टिपेश्वरमधील वाघ संवर्धनासाठी वनविभागाने केलेल्या प्रयत्नांचे मनापासून कौतुक केले. विशेषतः लॅन्टाना निर्मूलन (Lantana Removal) आणि गवताळ क्षेत्र विकास (Grassland Management) यांसारख्या उपक्रमांमुळे वन्यजीवांच्या अधिवासात झालेली सुधारणा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

या दौऱ्यादरम्यान टिपेश्वर वन विश्रामगृह येथे विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) पांढरकवडा श्री. उत्तम म. फड यांनी दिया मिर्झा व वैभव रेखी यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी जंगल व्यवस्थापन, जैवविविधता संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या कार्यपद्धतीबद्दल प्रभावित होत दिया मिर्झा यांनी संपूर्ण वन विभागाच्या कार्याचे कौतुक करत टिपेश्वरचे जंगल “सुंदर, समृद्ध आणि उत्तम व्यवस्थापित” असल्याचे मत व्यक्त केले.

या प्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) पारवा श्री. प्रशांत वि. सोनुले, वनपाल श्री. एस. जे. सोनट्टके, वनरक्षक श्री. डी. बी. पोटे, कार्यालयीन कर्मचारी श्री. साकीब म. शेख तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टिपेश्वर अभयारण्यातील ही भेट केवळ पर्यटनापुरती मर्यादित न राहता, वनसंवर्धनाबाबत जनजागृतीसाठीही प्रेरणादायी ठरली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पांढरकवडा पोलिसांची कारवाई : कत्तलीसाठी तेलंगणात नेण्याच्या तयारीतील 12 गोवंशांची सुटका, 8.80 लाखांचा मुद्देमाल जप्त

महावितरणच्या निष्काळजीपणाचा बळी; विजेचा धक्का लागून ३ दुभत्या गायींचा जागीच मृत्यू

मोमीन वेलफेअर फाऊंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; मुंतजीम खान इझहार खानचा जाहीर सत्कार

पांढरकवड्याचे नगराध्यक्ष आतिश उर्फ सोनूभैया बोरेले यांची महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या अमरावती विभाग उपाध्यक्षपदी निवड

ताडउमरीत तलवारींसह दोन गट आमनेसामने; पांढरकवडा पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

मोमिन वेलफेयर फाउंडेशन द्वारा मेधावी विद्यार्थियों का सम्मान समारोह

Leave a Comment