ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

तातापुरात हागोडबुआ देवस्थानाची भव्य यात्रा; ३ एप्रिलला चैत्र पौर्णिमेनिमित्त मोठा उत्सव

On: March 31, 2026 3:24 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा: अशफाक खान


केळापूर तालुक्यातील तातापुर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र पौर्णिमेनिमित्त हागोडबुआ देवस्थानाची भव्य यात्रा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली आहे. येत्या ३ एप्रिल २०२६, शुक्रवार रोजी हा धार्मिक सोहळा पार पडणार असून, भोई समाज बांधवांसह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवावी, असे आवाहन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
तातापुरातील हागोडबुआ देवस्थान हे भोई समाजाचे प्रमुख श्रद्धास्थान मानले जाते. अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या या यात्रेला दरवर्षी हजारो भाविक उपस्थित राहतात. धार्मिक श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक एकतेचे प्रतीक म्हणून या यात्रेकडे पाहिले जाते.

🎯 देवस्थानाची भावनिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी
या देवस्थानामागे एक हृदयस्पर्शी आणि श्रद्धेने भरलेली कथा सांगितली जाते. काही वर्षांपूर्वी तातापुर गावात सदबाजी इंगोले व त्यांच्या पत्नी सोनाबाई वास्तव्यास होते. सदबाजी अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते आणि ते दररोज आपल्या चार वर्षांच्या मुलासह संगमेश्वर नदीवर स्नानासाठी जात असत.
एके दिवशी नदीत आंघोळ करत असताना त्यांच्या मुलाचा अचानक आर्त किंकाळीचा आवाज आला. सदबाजी घाबरून इकडे-तिकडे शोध घेऊ लागले, मात्र मुलगा कुठेच दिसला नाही. रात्र होईपर्यंत त्यांनी शोध घेतला, तरीही काहीच हाती लागले नाही. घरी असलेल्या सोनाबाईंनाही मोठी चिंता लागून राहिली.
त्याच रात्री सोनाबाईंना स्वप्नात त्यांच्या मुलाने दर्शन देत सांगितले की, नदीत आंघोळ करत असताना त्याच्यावर वाघाने हल्ला केला आणि त्याचा मृत्यू झाला. शरीराचे अवयव नष्ट झाले असून फक्त उजव्या हाताची करंगळी शिल्लक आहे. ती करंगळी त्या ठिकाणी मिळेल आणि तिथेच त्याची स्थापना करावी, असेही स्वप्नात सांगण्यात आले.
विशेष म्हणजे, अशाच प्रकारचे स्वप्न आसपासच्या गावातील काही लोकांनाही पडले. दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, खरोखरच मुलाची करंगळी तेथे आढळून आली. या चमत्कारिक घटनेनंतर भोई समाज बांधवांनी त्या ठिकाणी श्रद्धेने स्थापना करून त्या देवतेला ‘हागोडबुआ’ असे नाव दिले.

🎯 चैत्र पौर्णिमेची परंपरा आजही कायम
त्या दिवसापासून दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हागोडबुआ यांच्या ‘लग्न सोहळ्या’निमित्त एक दिवसाची भव्य यात्रा भरवण्याची परंपरा सुरू झाली. आजही ही परंपरा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी केली जाते.

🎯 यात्रेचे आकर्षण आणि कार्यक्रम
यात्रेदरम्यान देवस्थान परिसरात विविध धार्मिक विधी, पूजाअर्चा, भजन-कीर्तन तसेच भाविकांसाठी प्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात येणार आहे. गावात उत्सवाचे वातावरण निर्माण होऊन विविध ठिकाणी सजावट, प्रकाशयोजना आणि भक्तिमय कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे.

🎯 समितीचे आवाहन
हागोडबुआ देवस्थान समितीचे अध्यक्ष कैलास नांन्ने, उपाध्यक्ष लिबाजी शिवरकर, कोषाध्यक्ष अमोल कार्लेकर तसेच सदस्य लक्ष्मण करलुके, बापू पारशिवे, रमेश शिवरकर, शेखर नांन्ने, प्रकाश पारशिवे, गोपाल नांन्ने, बंडुजी नांन्ने, अर्जुन करलुके, संजय नांन्ने, काशिनाथ पारशीवे, चंद्रकांत कामतवार, सुरेश करलुके, संतोष मांढरे, गजानन शिवरकर आदी पदाधिकाऱ्यांनी सर्व भोई समाज बांधवांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.

🎯 सामाजिक एकतेचा संदेश
ही यात्रा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून सामाजिक ऐक्य, परंपरा आणि श्रद्धेचा संगम आहे. तातापुरातील हागोडबुआ यात्रा ही परिसरातील लोकांसाठी श्रद्धेचा आणि एकोप्याचा मोठा उत्सव बनली असून, दरवर्षी ती अधिक भव्य स्वरूपात साजरी होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पांढरकवडा पोलिसांची कारवाई : कत्तलीसाठी तेलंगणात नेण्याच्या तयारीतील 12 गोवंशांची सुटका, 8.80 लाखांचा मुद्देमाल जप्त

महावितरणच्या निष्काळजीपणाचा बळी; विजेचा धक्का लागून ३ दुभत्या गायींचा जागीच मृत्यू

मोमीन वेलफेअर फाऊंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; मुंतजीम खान इझहार खानचा जाहीर सत्कार

पांढरकवड्याचे नगराध्यक्ष आतिश उर्फ सोनूभैया बोरेले यांची महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या अमरावती विभाग उपाध्यक्षपदी निवड

ताडउमरीत तलवारींसह दोन गट आमनेसामने; पांढरकवडा पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

मोमिन वेलफेयर फाउंडेशन द्वारा मेधावी विद्यार्थियों का सम्मान समारोह

Leave a Comment