ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

मोघे महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेचे थाटात उद्घाटन

On: April 2, 2026 5:58 AM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा: अशफाक खान


स्थानिक शिवरामजी मोघे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने  “एकविसाव्या शतकातील शाश्वत विकास” या विषयावर आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे थाटात उद्घाटन संपन्न झाले. विद्यापीठ गीत आणि महाराष्ट्र गीताने परिषदेची सुरुवात करण्यात आली.
      महाराष्ट्राचे माजी मंत्री मा. शिवाजीराव मोघे हे या परिषदेचे अध्यक्ष होते. विद्यार्थ्यांनी एमपीएससी, यूपीएससी सारख्या परीक्षेतून यश संपादन करून अधिकाराच्या आणि मानाच्या जागा मिळवाव्यात अशी अपेक्षा त्यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केली.
     संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. मिलिंद अ. बारहाते यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटकीय मार्गदर्शन करताना त्यांनी राष्ट्रीय परिषदेच्या आयोजनाची प्रशंसा करीत आदिवासीबहुल ग्रामीण भागातील या परिषदेसाठी विविध क्षेत्रातील संशोधकांनी 174 शोध निबंध पाठवल्याबद्दल समाधान व्यक्त केले. भविष्यामध्ये अशा प्रकारच्या परिषदांचे आयोजन होऊन विविध विषयांवर चर्चा होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
      रिद्धपूर अमरावती येथील मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. अविनाश आवलगावकर हे बीजभाषक होते. आपल्या बीज भाषणातून त्यांनी शाश्वत आणि विकास या संज्ञा स्पष्ट करीत शाश्वत हे कायमस्वरूपी आणि विकास हा परिवर्तनशील असतो अशी भूमिका मांडत शाश्वत विकासाकरिता विद्यार्थ्यांनी आणि तरुण पिढीने पुढाकार घेऊन काम करण्याची गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. सर्वांगाने त्यांनी विषयाची मांडणी करीत मराठी भाषा सुद्धा ज्ञान संपादनासाठी उत्तम भाषा आहे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.


   कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  महाविद्यालयाचे संस्था सचिव तथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य मा. विजयराव मोघे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना आपल्या परिसरामध्ये विज्ञान शाखेतील अभ्यासक्रमाची सोय उपलब्ध करून दिल्यामुळे आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना याचा मोठा उपयोग झाला आणि त्याची फलश्रुती म्हणजे ही परिषद होय असे भावनिक उद्गार त्यांनी यावेळी व्यक्त केले.
       महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय सोळंके यांनी प्रास्ताविकेतून परिषदेची भूमिका विशद करीत महाविद्यालयाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला.
    उद्घाटन सत्राचे बहारदार सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रदीप झिलपिलवार यांनी केले तर प्रा. डॉ. रमजान वीराणी यांनी आभार व्यक्त केले.
      परिषदेला विविध भागातील संशोधक, प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी, पत्रकार उपस्थित होते.
     परिषदेच्या यशस्वीतेसाठी आयोजक प्राचार्य डॉ. अजय सोळंके तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

लग्नाच्या उंबरठ्यावर दुर्दैवाचा घाला; घोटी येथे अपघातात १५ वर्षीय पुतण्याचा मृत्यू, दोघे जखमी

बुद्ध पौर्णिमा विशेष : पाथरी येथे एक दिवसीय विपश्यना शिबिराचे आयोजन; जुन्या साधकांसाठी सुवर्णसंधी

पाटणबोरीत गोवंशीय जनावरांची मोठी सुटका; दोन दिवसांत दोन कारवाया, ९ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

करंजीत ऑनलाईन क्रिकेट सट्ट्यावर पोलिसांची मोठी कारवाई; ९ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, ₹९६ हजारांचा मुद्देमाल जप्त

पांढरकवडा शहरातील वाहतूक प्रश्न बनला बिकट , वाहतूक ठप्प — शिबला रोडवर सर्वाधिक कोंडी; प्रशासनाचे दुर्लक्ष

उमरी (रोड) येथे शॉर्ट सर्किटमुळे मोबाईल दुकानाला भीषण आग; लाखोंचे नुकसान

Leave a Comment