ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

लिफ्ट मागितली अन् गाडीच पळवली!; माणुसकीचा गैरफायदा घेत तरुणाला गंडा

On: April 7, 2026 4:41 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा: अशफाक खान

“भलाई का तो जमाना ही नही रहा” या म्हणीचा प्रत्यय आणून देणारी धक्कादायक घटना पांढरकवडा शहरात उघडकीस आली आहे. पायी चालणाऱ्या अनोळखी इसमाला मदत करण्याच्या हेतूने एका दुचाकीस्वार तरुणाने ‘लिफ्ट’ दिली; मात्र त्याच इसमाने चलाखीने संधी साधत अख्खी मोटारसायकलच चोरून नेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

ही घटना ५ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास पांढरकवडा येथील सरकारी दवाखाना परिसरात घडली असून, या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा सविस्तर तपशील

झरी जामणी तालुक्यातील दाभाडी येथील रहिवासी विनोद महादेव मेश्राम (वय ३६) हे ५ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ९ वाजताच्या दरम्यान आपल्या एमएच २९ एएल ६०५६ क्रमांकाच्या दुचाकीने पांढरकवड्याकडे येत होते. दरम्यान कटली-बोरगाव परिसरात एका अनोळखी इसमाने त्यांना हात दाखवून लिफ्टची विनंती केली.

माणुसकीच्या भावनेतून मेश्राम यांनी त्या इसमाला आपल्या दुचाकीवर बसवले. काही अंतर पार केल्यानंतर त्या इसमाने “मी गाडी चालवतो, तुम्ही मागे बसा” असे सांगून स्वतः वाहन चालवायला घेतले. सुरुवातीला काहीही संशय न आल्याने मेश्राम यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.

🎯 तहान लागल्याचा बनाव अन् डाव यशस्वी
दोघेही पांढरकवडा शहरातील सरकारी दवाखाना परिसरात पोहोचल्यानंतर त्या इसमाने “मला खूप तहान लागली आहे, पाणी आणा” असा बहाणा केला. मेश्राम पाणी आणण्यासाठी दवाखान्यात गेले असता, काही क्षणातच आरोपीने संधी साधत मोटारसायकलसह तेथून पलायन केले. मेश्राम परत आल्यावर त्यांना दुचाकी आणि संबंधित इसम दोन्ही गायब झाल्याचे लक्षात आले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे ते हादरले.

🎯 ५० हजारांची दुचाकी लंपास
या घटनेत सुमारे ५० हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरीला गेल्याचे समोर आले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मेश्राम यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

🎯 पोलीस तपासाला वेग
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पोलीस हवालदार रजनिकांत पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.

अनोळखी व्यक्तींना लिफ्ट देताना विशेष खबरदारी घ्यावी, तसेच कोणालाही वाहन सहजपणे चालविण्यास देऊ नये,  अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे अत्यावश्यक  आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पांढरकवडा पोलिसांची कारवाई : कत्तलीसाठी तेलंगणात नेण्याच्या तयारीतील 12 गोवंशांची सुटका, 8.80 लाखांचा मुद्देमाल जप्त

महावितरणच्या निष्काळजीपणाचा बळी; विजेचा धक्का लागून ३ दुभत्या गायींचा जागीच मृत्यू

मोमीन वेलफेअर फाऊंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; मुंतजीम खान इझहार खानचा जाहीर सत्कार

पांढरकवड्याचे नगराध्यक्ष आतिश उर्फ सोनूभैया बोरेले यांची महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या अमरावती विभाग उपाध्यक्षपदी निवड

ताडउमरीत तलवारींसह दोन गट आमनेसामने; पांढरकवडा पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

मोमिन वेलफेयर फाउंडेशन द्वारा मेधावी विद्यार्थियों का सम्मान समारोह

Leave a Comment