ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

पांढरकवडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त केळापूर तालुका काँग्रेसतर्फे अभिवादन

On: April 14, 2026 8:23 AM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा: अशफाक खान


भारताचे संविधान शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज दि. 14 एप्रिल 2026 रोजी केळापूर तालुका काँग्रेसच्या वतीने पांढरकवडा येथील तहसील चौकात त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. सामाजिक समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर चालण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाला तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रेम राठोड यांच्या

नेतृत्वात माजी तालुका काँग्रेस अध्यक्ष अमर पाटील, मनोज भोयर, शहराध्यक्ष अनिस पोसवाल, ॲड. अनिल किनाके, संतोष राऊत, काजी सर, सौ. सोमित्रा टेकाम, ठाकरे सर, ॲड. शेंडे, हफिज पोसवाल, इकराम अली, करीम मामू, खालिक पटेल, शेषराव जिद्देवार, दिलीप गावंडे, उगले सर, पप्पू रेकुलवार, बंडू वाघाडे, भीम सिंग राठोड, दमयंती ठाकरे, प्रीती मेश्राम, डॉ. प्रेरणा उगले, विठ्ठल आडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

या प्रसंगी मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा समाजावर झालेला प्रभाव अधोरेखित करत, आजच्या काळात त्यांच्या शिकवणीचे पालन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमात शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात अभिवादन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध ठिकाणीही अभिवादनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment