ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

पांढरकवडा घाटंजी मार्गांवरील साखरा जवळ भीषण अपघात : बाप-लेकीचा जागीच मृत्यू, महिला गंभीर जखमी

On: April 14, 2026 7:02 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️पांढरकवडा– अशफाक खान


पांढरकवडा  घाटंजी मार्गावरील साखरा गावालगत १४ एप्रिलच्या रात्री 8 वाजता दरम्यान भीषण अपघात घडून एकाच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. ट्रक आणि चारचाकी वाहनामध्ये झालेल्या या धडक अपघातात बाप आणि सहा महिन्यांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पांढरकवडा येथून घाटंजीकडे जाणाऱ्या ट्रकची आणि साखरा गावाकडून येणाऱ्या चारचाकी स्विफ्ट डिझायर वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात चारचाकी वाहन पूर्णपणे चकनाचूर झाले.

या दुर्घटनेत साईकिरण गुरगुल्ला 32 वर्ष आणि त्यांची सहा महिन्यांची मुलगी हंसिका साईकिरण गुरगुल्ला यांचा जागीच मृत्यू झाला. तर अनुष्का साईकिरण गुरगुल्ला या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने यवतमाळ येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

हा परिवार साखरा येथील माहेरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आला होता. कार्यक्रम आटोपून ते परत आदिलाबादकडे चारचाकी वाहनाने जात असताना नियतीने हा घात केला.

अपघाताची माहिती मिळताच घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर निखिल पुंडे आणि समाजसेवक मुज्जू पटेल व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. त्यांनी जखमी महिलेला त्वरित रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. दरम्यान, दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, सणाच्या दिवशीच घडलेल्या या दुर्दैवी अपघाताने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पांढरकवडा पोलिसांची कारवाई : कत्तलीसाठी तेलंगणात नेण्याच्या तयारीतील 12 गोवंशांची सुटका, 8.80 लाखांचा मुद्देमाल जप्त

महावितरणच्या निष्काळजीपणाचा बळी; विजेचा धक्का लागून ३ दुभत्या गायींचा जागीच मृत्यू

मोमीन वेलफेअर फाऊंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; मुंतजीम खान इझहार खानचा जाहीर सत्कार

पांढरकवड्याचे नगराध्यक्ष आतिश उर्फ सोनूभैया बोरेले यांची महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या अमरावती विभाग उपाध्यक्षपदी निवड

ताडउमरीत तलवारींसह दोन गट आमनेसामने; पांढरकवडा पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

मोमिन वेलफेयर फाउंडेशन द्वारा मेधावी विद्यार्थियों का सम्मान समारोह

Leave a Comment