ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

पांढरकवड्याचा अभिमान!  ऋषिकेश कामटकर यांची अंतरिक्ष विभागात ‘टेक्निशियन B’ पदावर निवड

On: April 15, 2026 12:47 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा: अशफाक खान


पांढरकवडा शहरासाठी अभिमानाची बातमी समोर आली असून येथील तरुण   ऋषीकेश नंदकिशोर कामटकर यांची भारत सरकारच्या अंतरिक्ष विभागांतर्गत कार्यरत असलेल्या Indian Space Research Organisation (ISRO) मध्ये ‘टेक्निशियन B’ पदावर निवड झाली आहे. त्यांची नियुक्ती Liquid Propulsion Systems Centre (LPSC), वलियमला, तिरुवनंतपुरम येथे करण्यात आली आहे.

ऋषीकेश यांनी २०२२ साली घेतलेल्या CTS (Craftsmen Training Scheme) परीक्षेत आयटीआय पांढरकवडा येथून MAEE (Mechanic Auto Electrical and Electronics) या ट्रेडमधून संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली होती. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळेच त्यांना अंतरिक्ष क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली आहे.

पांढरकवडा सारख्या लहान शहरातून, साध्या कुटुंबातील युवकाने देशाच्या प्रतिष्ठित अंतरिक्ष संस्थेत स्थान मिळवणे ही अत्यंत अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब मानली जात आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून तरुणांसाठी ते एक प्रेरणास्थान ठरत आहेत.

ऋषीकेश यांच्या निवडीबद्दल पांढरकवडा नगरपरिषदचे उपनगराध्यक्ष आतिष चव्हाण तसेच माऊली दुर्गा मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला संतोष पेंदोर, राहुल कात्रजवार, अभि सोयाम, नवीन करमिलकर, सुजल तावरे, रुषभ करपते, सिद्धांत भोयर तसेच इतर मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी रुषीकेश यांच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे कौतुक करत त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. भविष्यातही त्यांनी देशसेवेत महत्त्वपूर्ण योगदान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
रुषीकेश कामटकर यांचे यश हे केवळ त्यांच्या कुटुंबासाठी नव्हे तर संपूर्ण पांढरकवडा  शहरासाठी अभिमानाची बाब ठरली असून, त्यांच्या या यशामुळे इतर तरुणांना देखील मोठी प्रेरणा मिळणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पांढरकवडा पंचायत समितीतील ‘मनरेगा’ विहीर योजनेत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून १५ हजारांपर्यंत लाच मागणी; मस्टर रोखून आर्थिक शोषण होत असल्याचा मनसेचा आरोप

महावितरणचे लोखंडी पोल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पांढरकवडा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ५ आरोपी अटकेत, ५ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

साधेपणातून समाजाला नवी दिशा; मुक नवदांपत्याचा आदर्श विवाह सोहळा जंगोदाई पेनठाणा टेकडीवर संपन्न अवाजवी खर्चाला फाटा, वेळेत पार पडला विवाह; प्रेम, आत्मविश्वास आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संदेश

मचानांवरची एक रात्र: टिपेश्वरच्या जंगलात उलगडले वन्यजीवनाचे अनेक चेहरे वाघासह विविध प्राण्यांची नोंद; ३६ मचानांवरून रात्रभर चालले वैज्ञानिक निरीक्षण, पर्यटकांचा उत्स्फूर्त सहभाग

रुंझा येथील युवा नेतृत्व शहजाद सिद्दीकी यांचा शिंदे सेनेत भव्य प्रवेश; शेकडो कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पांढरकवडा शोकमग्न : बस डेपोतील वाहतूक नियंत्रक दिलीप पंधरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Leave a Comment