ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

पांढरकवडा : गुरुकुल इंग्लिश मिडीयमच्या मुंतझीम खानची CBSE दहावी परीक्षेत 91.4% गुणांसह दमदार कामगिरी

On: April 15, 2026 4:28 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा:प्रतिनीधी


दि. 15 एप्रिल रोजी जाहीर झालेल्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) दहावीच्या परीक्षेच्या निकालात पांढरकवडा येथील गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूलचा विद्यार्थी मुंतझीम खान याने उल्लेखनीय यश संपादन करत 91.4 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे. त्याच्या या उज्ज्वल यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मुंतझीम खान हा पांढरकवडा वनविभागात राऊंड ऑफिसर म्हणून कार्यरत असलेले इझहार खान इसाक खान यांचा एकुलता एक मुलगा आहे. त्यांचे कुटुंब येथील आशियाना लेआऊट परिसरात वास्तव्यास असून, शैक्षणिक वातावरणात वाढलेल्या मुंतझीमने सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्तबद्ध दिनचर्या आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या बळावर हे यश संपादन केले आहे.

लहानपणापासूनच अभ्यासात प्राविण्य मिळवणारा आणि जिज्ञासू वृत्ती असलेला मुंतझीम हा शाळेतील एक होतकरू व हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. त्याच्या या यशामुळे शाळेचे नावही उज्ज्वल झाले असून, गुरुकुल इंग्लिश मिडीयमच्या शिक्षकवृंदांनी त्याचे विशेष कौतुक केले आहे.

या यशाबद्दल बोलताना मुंतझीम खान याने सांगितले की, “नियमित अभ्यास, वेळेचे योग्य नियोजन आणि पालक-शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच मला हे यश मिळाले. पुढे मला वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे असून डॉक्टर बनण्याचे माझे स्वप्न आहे.”
मुंतझीमच्या या यशाबद्दल त्याचे पालक, नातेवाईक, मित्रमंडळी यांनी अभिनंदन केले असून, पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पांढरकवडा पंचायत समितीतील ‘मनरेगा’ विहीर योजनेत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून १५ हजारांपर्यंत लाच मागणी; मस्टर रोखून आर्थिक शोषण होत असल्याचा मनसेचा आरोप

महावितरणचे लोखंडी पोल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पांढरकवडा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ५ आरोपी अटकेत, ५ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

साधेपणातून समाजाला नवी दिशा; मुक नवदांपत्याचा आदर्श विवाह सोहळा जंगोदाई पेनठाणा टेकडीवर संपन्न अवाजवी खर्चाला फाटा, वेळेत पार पडला विवाह; प्रेम, आत्मविश्वास आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संदेश

मचानांवरची एक रात्र: टिपेश्वरच्या जंगलात उलगडले वन्यजीवनाचे अनेक चेहरे वाघासह विविध प्राण्यांची नोंद; ३६ मचानांवरून रात्रभर चालले वैज्ञानिक निरीक्षण, पर्यटकांचा उत्स्फूर्त सहभाग

रुंझा येथील युवा नेतृत्व शहजाद सिद्दीकी यांचा शिंदे सेनेत भव्य प्रवेश; शेकडो कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पांढरकवडा शोकमग्न : बस डेपोतील वाहतूक नियंत्रक दिलीप पंधरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Leave a Comment