ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

पांढरकवड्याचे ज्येष्ठ हृदयरोग तज्ञ डॉ. हनुमंतराव कन्ना यांचे दुःखद निधन

On: April 19, 2026 12:23 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा | अशफाक खान

पांढरकवडा शहरासाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आली असून, येथील सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ हृदयरोग तज्ञ डॉ. हनुमंतराव कन्ना यांचे रविवारी (दि. 19 एप्रिल) मध्यरात्री उपचारादरम्यान नागपूर येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि प्रकृती खालावल्यामुळे त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले होते.

डॉ. कन्ना यांनी 1990 पासून पांढरकवडा शहरात वैद्यकीय सेवा सुरू केली होती. गेली तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी हजारो रुग्णांवर उपचार करून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. शहरातील जुन्या प्रोजेक्ट ऑफिसजवळ त्यांचे क्लिनिक होते, जे अनेक वर्षे नागरिकांसाठी विश्वासाचे केंद्र बनले होते.

विशेष म्हणजे, पांढरकवडा व परिसरातील ते एकमेव अनुभवी हृदयरोग तज्ञ होते. त्यामुळे रात्री-अपरात्री छातीत वेदना, हृदयविकाराचा त्रास किंवा अन्य गंभीर समस्या उद्भवल्यास रुग्णांना सर्वप्रथम डॉ. कन्ना यांच्या क्लिनिकमध्येच नेले जात असे. त्यांच्या अचूक निदान आणि तत्पर उपचारामुळे अनेक रुग्णांचे जीव वाचले. त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचाराची दिशा ठरवली जात असे, यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड विश्वास होता.

डॉ. कन्ना यांचे व्यक्तिमत्त्व केवळ डॉक्टर म्हणूनच नव्हे, तर एक सेवाभावी आणि समर्पित वैद्यकीय व्यावसायिक म्हणूनही ओळखले जात होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजाच्या आरोग्यसेवेसाठी समर्पित केले होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. ते पारवेकर घराण्याचे जावई होते.
त्यांच्या पार्थिवावर आज रविवारी दुपारी 3  वाजता दरम्यान सायखेडा धरण परिसरातील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने पांढरकवडा शहरासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, वैद्यकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
डॉ. हनुमंतराव कन्ना यांच्या निधनामुळे एक अनुभवी, विश्वासू आणि जनतेचा खरा सेवक हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पांढरकवडा पोलिसांची कारवाई : कत्तलीसाठी तेलंगणात नेण्याच्या तयारीतील 12 गोवंशांची सुटका, 8.80 लाखांचा मुद्देमाल जप्त

महावितरणच्या निष्काळजीपणाचा बळी; विजेचा धक्का लागून ३ दुभत्या गायींचा जागीच मृत्यू

मोमीन वेलफेअर फाऊंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; मुंतजीम खान इझहार खानचा जाहीर सत्कार

पांढरकवड्याचे नगराध्यक्ष आतिश उर्फ सोनूभैया बोरेले यांची महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या अमरावती विभाग उपाध्यक्षपदी निवड

ताडउमरीत तलवारींसह दोन गट आमनेसामने; पांढरकवडा पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

मोमिन वेलफेयर फाउंडेशन द्वारा मेधावी विद्यार्थियों का सम्मान समारोह

Leave a Comment