ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

सायखेडा  धरण शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडाकेबाज कारवाई; १०.१२ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त, आरोपी अटकेत

On: April 21, 2026 2:53 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️पांढरकवडा : अशफाक खान


राज्य उत्पादन शुल्क विभाग, पांढरकवडा पथकाने मंगळवार (दि. २१ एप्रिल २०२६) रोजी मोठी धडक कारवाई करत सायखेडा  धरण गावाच्या शिवारात तब्बल १० लाख १२ हजार ५६० रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अवैध मद्य व्यवसायावर मोठा आळा बसल्याचे चित्र आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पथकाने मौजा सायखेडा येथील अनिल काशिनाथ मुजारीया यांच्या शेतात छापा टाकला. या वेळी महिंद्रा सुप्रो मिनी ट्रक (क्र. MH 04 JK 8842) मध्ये व शेजारील टिनशेडमध्ये मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी मद्यसाठा सापडला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये देशी दारूच्या हजारो बाटल्या, विदेशी मद्याच्या बाटल्या तसेच एक मोबाईलचा समावेश आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी कमलेश अनिल मुजारीया (रा. सायखेडा ता.केळापूर) याला अटक केली. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत विविध कलमांनुसार तसेच भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी (PCR) सुनावली आहे.

या प्रकरणातील विशेष बाब म्हणजे जप्त करण्यात आलेला मद्यसाठा हा गोवा राज्यात तयार केलेला बनावट देशी मद्य असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. यामुळे महाराष्ट्र शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणामागे आंतरराज्यीय टोळी सक्रिय असल्याचा संशय असून मद्य पुरवठा करणारे व वितरक सध्या फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह-आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उप-आयुक्त पराग नवलकर व अधीक्षक नितेश शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पुरुषोत्तम बोढारे यांच्या नेतृत्वात पार पडली. या मोहिमेत दुय्यम निरीक्षक निलेशकुमार वानखडे (तपास अधिकारी) यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अवैध मद्यनिर्मिती, विक्री किंवा वाहतुकीबाबत कोणतीही माहिती असल्यास विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८०० ८३३ ३३३३ किंवा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक ८४२२००११३३ वर संपर्क साधावा.
अशा प्रकारच्या कारवायांमुळे अवैध मद्य व्यवसायाविरोधात कठोर संदेश गेला असून पुढील काळातही अशाच धडक मोहिमा राबविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पांढरकवडा पोलिसांची कारवाई : कत्तलीसाठी तेलंगणात नेण्याच्या तयारीतील 12 गोवंशांची सुटका, 8.80 लाखांचा मुद्देमाल जप्त

महावितरणच्या निष्काळजीपणाचा बळी; विजेचा धक्का लागून ३ दुभत्या गायींचा जागीच मृत्यू

मोमीन वेलफेअर फाऊंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; मुंतजीम खान इझहार खानचा जाहीर सत्कार

पांढरकवड्याचे नगराध्यक्ष आतिश उर्फ सोनूभैया बोरेले यांची महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या अमरावती विभाग उपाध्यक्षपदी निवड

ताडउमरीत तलवारींसह दोन गट आमनेसामने; पांढरकवडा पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

मोमिन वेलफेयर फाउंडेशन द्वारा मेधावी विद्यार्थियों का सम्मान समारोह

Leave a Comment