ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

बुद्ध पौर्णिमा विशेष : पाथरी येथे एक दिवसीय विपश्यना शिबिराचे आयोजन; जुन्या साधकांसाठी सुवर्णसंधी

On: April 28, 2026 2:48 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा : सफी खान


बुद्ध पौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त सारिपुत्त चॅरिटेबल ट्रस्ट, घाटंजी यांच्या वतीने एक दिवसीय विपश्यना शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, ध्यानसाधनेद्वारे आत्मिक शांती व अंतर्मनाची स्थिरता मिळविण्याची ही एक अनमोल संधी साधकांना उपलब्ध झाली आहे. हे विशेष शिबिर शनिवार, दिनांक 2 मे 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत पार पडणार आहे.

हे शिबिर पांढरकवडा तालुक्यातील पाथरी येथील विपश्यना सेंटर येथे आयोजित करण्यात आले असून, निसर्गरम्य व शांत वातावरणात साधकांना ध्यानाचा सखोल अनुभव घेता येणार आहे. विशेष बाब म्हणजे, हे शिबिर केवळ जुन्या साधकांसाठीच (ज्यांनी किमान एक किंवा त्यापेक्षा अधिक विपश्यना शिबिरे पूर्ण केली आहेत) खुले ठेवण्यात आले आहे.

विपश्यना ही प्राचीन भारतीय ध्यानपद्धती असून, मनाची शुद्धी, आत्मनिरीक्षण आणि अंतर्मुखतेच्या माध्यमातून जीवनातील तणाव, चिंता आणि अस्थिरता दूर करण्यासाठी उपयुक्त मानली जाते. “सम्मग्गन तपो सुखो” या बुद्धांच्या तत्वज्ञानावर आधारित या शिबिरात साधकांना पुन्हा एकदा ध्यानाच्या माध्यमातून आत्मिक उन्नतीचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

शिबिरादरम्यान साधकांसाठी सकाळचा नाश्ता तसेच दुपारच्या जेवणाची  व्यवस्था करण्यात येणार आहे. शिस्तबद्ध वातावरणात, नियमांचे पालन करत ध्यान साधना करण्यावर भर दिला जाणार असून, अनुभवी मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम पार पडणार आहे.
सारिपुत्त चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सर्व जुन्या साधकांना या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ध्यान साधनेत सातत्य राखण्यासाठी आणि अंतर्मनाला नवचैतन्य देण्यासाठी अशा उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

🎯 शिबिर स्थळ: विपश्यना सेंटर, पाथरी (ता. पांढरकवडा, जि. यवतमाळ) – पाथरी ते दाभा मार्गावर स्थित
⏰ वेळ: सकाळी 10 ते सायंकाळी 4
🔺दिनांक: शनिवार, 2 मे 2026
🔺संपर्क:
श्री. अशोक सेलुकर – 9021856736
श्री. भगवान सरदार – 7887591959
श्री. प्रज्योत भगत – 9325373480
🔺 तरी, सर्व पात्र साधकांनी या आध्यात्मिक पर्वाचा लाभ घेऊन ध्यान साधनेत अधिक गती प्राप्त करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पांढरकवडा पोलिसांची कारवाई : कत्तलीसाठी तेलंगणात नेण्याच्या तयारीतील 12 गोवंशांची सुटका, 8.80 लाखांचा मुद्देमाल जप्त

महावितरणच्या निष्काळजीपणाचा बळी; विजेचा धक्का लागून ३ दुभत्या गायींचा जागीच मृत्यू

मोमीन वेलफेअर फाऊंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; मुंतजीम खान इझहार खानचा जाहीर सत्कार

पांढरकवड्याचे नगराध्यक्ष आतिश उर्फ सोनूभैया बोरेले यांची महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या अमरावती विभाग उपाध्यक्षपदी निवड

ताडउमरीत तलवारींसह दोन गट आमनेसामने; पांढरकवडा पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

मोमिन वेलफेयर फाउंडेशन द्वारा मेधावी विद्यार्थियों का सम्मान समारोह

Leave a Comment