ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

“200 रुपये पडले” म्हणत 4 लाखांची चलाखीने लूट

On: May 2, 2026 2:29 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा: अशफाक खान


शहरात भरदिवसा घडलेल्या धक्कादायक प्रकारात एका शेतकऱ्याची तब्बल 4 लाख रुपयांची चलाखीने लूट करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात चिंतेची भावना व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केळापूर तालुक्यातील मिरा (जिरा) ता.केळापूर येथील शेतकरी गजेन्द्र सदाशिव राठोड (वय 45) यांनी पांढरकवडा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2), 3(3) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

🎯 घटनेचा सविस्तर तपशील
राठोड यांनी घराच्या दुरुस्तीकरिता घेतलेल्या कर्जाची काही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झाली होती. तसेच शेती कामांसाठी व गहाण ठेवलेले सोने सोडवण्यासाठी त्यांना पैशांची गरज होती. त्यासाठी त्यांनी दि. 2 मे 2026 रोजी सकाळी सुमारे 11 वाजता HDFC Bank, पांढरकवडा शाखेतून चेकद्वारे 4 लाख रुपये काढले.
ही संपूर्ण रक्कम त्यांनी कापडी पिशवीत ठेवून मोटारसायकलच्या टाकीवरील डिक्कीमध्ये सुरक्षित ठेवली होती. मात्र, बँकेसमोरून निघत असतानाच आरोपींनी अत्यंत चलाखीने आपली योजना अंमलात आणली.
एक अज्ञात इसम राठोड यांच्या जवळ येऊन म्हणाला, “तुमचे 200 रुपये खाली पडले आहेत”, असे सांगून त्यांचे लक्ष विचलित केले. राठोड खाली पाहू लागल्याचा फायदा घेत दुसऱ्या आरोपीने मोटारसायकलवरील डिक्कीतील पिशवी चोरून घेतली. त्यानंतर दोन्ही आरोपी काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर बसून घटनास्थळावरून वेगाने फरार झाले.

🎯 पाठलाग, पण आरोपी फरार
घटना लक्षात येताच राठोड यांनी तत्काळ आरोपींचा पाठलाग सुरू केला. त्यांनी  शहरातील बिरसा मुंडा चौक पर्यंत आरोपींचा पाठलाग केला, मात्र आरोपींचा काहीच मागमूस लागला नाही.

🎯 आरोपींचे वर्णन
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार आरोपींचे वर्णन पुढीलप्रमाणे –
🔺एक आरोपी भुरकट रंगाचा शर्ट व पांढरी पँट परिधान केलेला होता
🔺दुसरा आरोपी लाल रंगाचा शर्ट व डोक्यावर पांढरा शेला बांधलेला होता
दोघेही सराईत गुन्हेगार असावेत असा प्राथमिक अंदाज  व्यक्त केला जात आहे.

🎯 पोलिसांची कारवाई
या घटनेनंतर पांढरकवडा पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. परिसरातील CCTV फुटेज तपासले जात असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर करीत आहेत.

🎯 नागरिकांना पोलिसांचे आवाहन
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
बँकेतून मोठी रक्कम काढल्यानंतर अनोळखी व्यक्तींशी संवाद टाळावा
पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवावेत
संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी

⛔ ही घटना केवळ एका शेतकऱ्यापुरती मर्यादित नसून, सर्वसामान्य नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित करणारी आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

शाळा सुरू होण्यापूर्वी शालेय वाहनांची विशेष फिटनेस तपासणी मोहीम राबवा; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी भाऊ अतुल पांडे यांची मागणी

‘स्मार्ट मीटर’ची सक्ती केल्यास महावितरणला ‘मनसे स्टाईल’ झटका देणार; वणीमध्ये मनसे आक्रमक, उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन!

पांढरकवडा पोलिसांची कारवाई : कत्तलीसाठी तेलंगणात नेण्याच्या तयारीतील 12 गोवंशांची सुटका, 8.80 लाखांचा मुद्देमाल जप्त

जळका शिवारातील अज्ञात मृतदेहाची ओळख पटली; मृतक पांढरकवड्यातील राहुल जोशी

महावितरणच्या निष्काळजीपणाचा बळी; विजेचा धक्का लागून ३ दुभत्या गायींचा जागीच मृत्यू

मोमीन वेलफेअर फाऊंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; मुंतजीम खान इझहार खानचा जाहीर सत्कार

Leave a Comment