ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

पांढरकवडा शोकमग्न : बस डेपोतील वाहतूक नियंत्रक दिलीप पंधरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

On: May 3, 2026 6:21 AM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा : सफी खान


शहरातील पांढरकवडा बस डेपोमध्ये वाहतूक नियंत्रक पदावर कार्यरत असलेले दिलीप पंधरे (वय अंदाजे 50 वर्ष) यांचे शनिवारी (दि. 2 मे) रात्री सुमारे 8 वाजताच्या सुमारास दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत असून परिवहन विभागासह परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप पंधरे हे संध्याकाळच्या सुमारास पायी घराकडे येत असताना लायब्ररी चौक परिसरात अचानक त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. यावेळी ते अचानक खाली कोसळले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ धाव घेत त्यांना मदत केली आणि कोणतीही विलंब न करता त्यांना उमरी येथील ख्रिश्चन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथे उपस्थित डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

या घटनेनंतर त्यांच्या पार्थिवाला पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. रविवारी (दि. 3 मे) सकाळी त्यांची उत्तरीय तपासणी करण्यात येणार असून त्यानंतर दुपारी  टिटवी ता.घाटंजी येथील मोक्षधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दिलीप पंधरे हे शहरातील हनुमान वॉर्डमधील  त्यांच्या मालकीच्या‘पंधरे कॉम्प्लेक्स’ येथे वास्तव्यास होते. ते स्वभावाने अत्यंत मनमिळाऊ, शांत आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जात होते. बस डेपोमधील सहकारी तसेच शहरातील नागरिकांमध्ये त्यांचा विशेष आदर होता. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्चात एक 26 वर्षांची अविवाहित मुलगी आणि 21 वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या पत्नीचे सुमारे साडे तीन वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे आधीच दुःखातून सावरणाऱ्या कुटुंबावर पुन्हा एकदा दुःखाचा मोठा आघात झाला आहे.

दरम्यान, त्यांच्या निधनाची बातमी कळताच बस डेपोतील सहकारी, मित्रपरिवार आणि नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. अनेकांनी त्यांच्या कार्यपद्धतीचे आणि साध्या, प्रामाणिक स्वभावाचे स्मरण करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

दिलीप पंधरे यांच्या अकस्मात जाण्यामुळे पांढरकवडा शहराने एक कर्तव्यदक्ष अधिकारी आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व गमावले असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पांढरकवडा पोलिसांची कारवाई : कत्तलीसाठी तेलंगणात नेण्याच्या तयारीतील 12 गोवंशांची सुटका, 8.80 लाखांचा मुद्देमाल जप्त

महावितरणच्या निष्काळजीपणाचा बळी; विजेचा धक्का लागून ३ दुभत्या गायींचा जागीच मृत्यू

मोमीन वेलफेअर फाऊंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; मुंतजीम खान इझहार खानचा जाहीर सत्कार

पांढरकवड्याचे नगराध्यक्ष आतिश उर्फ सोनूभैया बोरेले यांची महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या अमरावती विभाग उपाध्यक्षपदी निवड

ताडउमरीत तलवारींसह दोन गट आमनेसामने; पांढरकवडा पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

मोमिन वेलफेयर फाउंडेशन द्वारा मेधावी विद्यार्थियों का सम्मान समारोह

Leave a Comment