ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

सिनेस्टाईल पाठलागानंतर ‘कंटेनर’ जेरबंद! मोहदा ढाबा परिसरात मध्यरात्री पोलिसांची धडक कारवाई; २५ गोवंशीय जनावरांची सुटका, १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

On: May 15, 2026 5:36 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा : अशफाक खान


पांढरकवडा–यवतमाळ राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा गोवंश तस्करीचे जाळे उघडकीस आले असून पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत भरधाव कंटेनर पकडून मोठी कारवाई केली. मोहदा येथील हिंदुस्तानी ढाबा परिसरात मध्यरात्री सापळा रचून करण्यात आलेल्या या कारवाईत २५ गोवंशीय बैलांची सुटका करण्यात आली असून सुमारे १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अंधाराचा फायदा घेत चालक घटनास्थळावरून पसार झाला असून त्याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पांढरकवडा–यवतमाळ मार्ग हा सध्या जनावर तस्करीसाठी महत्त्वाचा मार्ग बनत चालल्याची चर्चा सुरू असतानाच ही कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून सतत गस्त आणि तपासणी केली जात असतानाही तस्कर इतक्या धाडसाने अवैध वाहतूक कशी करतात, याबाबत नागरिकांमध्येही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गुप्त माहितीवरून सापळा

यवतमाळ रोडकडून मोहदा मार्गे पांढरकवड्याकडे येणाऱ्या आयशर कंपनीच्या कंटेनर वाहन क्रमांक HR55T4295 मधून गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले.

पोलीस कर्मचारी, पंच आणि सहकारी कर्मचाऱ्यांसह मोहदा येथील हिंदुस्तानी ढाबा परिसरात रात्री उशिरा सापळा रचण्यात आला. काही वेळातच संशयित कंटेनर भरधाव वेगाने येताना दिसला. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा दिला; मात्र चालकाने आदेश न पाळता वाहनाचा वेग वाढवत पळ काढण्याचा प्रयत्न केला.

🎯 सिनेस्टाईल पाठलाग; चालक फरार
कंटेनर चालकाने पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करत वाहन भरधाव वेगाने पुढे नेले. यानंतर पोलिसांनीही तातडीने पाठलाग सुरू केला. काही अंतरावर मोहदा गावाजवळील मैदानात चालकाने कंटेनर उभा केला आणि अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाला.
यानंतर पंचांसमक्ष कंटेनरची तपासणी करण्यात आली. वाहनाचे दरवाजे उघडताच पोलिसांनाही धक्का बसला. कंटेनरमध्ये तब्बल २५ गोवंशीय बैल अत्यंत अमानुष परिस्थितीत कोंबून ठेवण्यात आले होते.

🎯 जनावरांवर क्रूरतेची परिसीमा
तपासणीदरम्यान अनेक जनावरांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे समोर आले. जनावरांचे पाय आणि माने आखूड दोऱ्यांनी घट्ट बांधण्यात आले होते. कंटेनरमध्ये चारा किंवा पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. उष्णता आणि गुदमरलेल्या वातावरणामुळे अनेक जनावरे दमछाक झालेल्या अवस्थेत होती.

एका बैलाचा पाय मोडल्यासारखा दिसून आला, तर दुसऱ्या बैलाचे शिंग तुटलेले असल्याचेही निदर्शनास आले. पोलिसांनी व्यक्त केलेल्या प्राथमिक संशयानुसार ही जनावरे कत्तलीसाठी अदिलाबादकडे नेण्यात येत होती.

🎯 १७ लाखांचा मुद्देमाल जप्त
या कारवाईत पोलिसांनी अंदाजे ५ लाख रुपये किमतीची २५ गोवंशीय जनावरे तसेच सुमारे १२ लाख रुपये किमतीचा आयशर कंटेनर जप्त केला. अशाप्रकारे एकूण १७ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला आहे.
सुटका करण्यात आलेल्या सर्व जनावरांना पांढरकवडा नगर परिषद गुरांच्या कोंडवाड्यात हलविण्यात आले असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे.

🎯 विविध कलमान्वये गुन्हा दाखल
या प्रकरणी अज्ञात चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१ सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारित कायदा १९९५) तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पांढरकवडा पोलीस करीत आहेत.
दरम्यान, या कारवाईमुळे महामार्गावरील गोवंश तस्करीच्या वाढत्या प्रकारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून तस्करीमागील मोठ्या साखळीचा तपास करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पांढरकवड्यात हयात प्रमाणपत्र शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

पांढरकवडा पोलिसांची मोठी कामगिरी तीन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस; सराईत चोरट्यास अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

पांढरकवड्यात उपविभागीय पोलिस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या पथकाची धडक कारवाई

वणी-मारेगाव रस्त्यावर भीषण अपघात, मारेगावचे सचिन देवाळकर जागीच ठार; ओव्हरटेकच्या प्रयत्नात दोन चारचाकींची समोरासमोर भीषण धडक

कळंब भूमीअभिलेख कार्यालयात एसीबीची धडक कारवाई, फेरफार नोंदणीसाठी २५ हजारांची लाच घेताना परिरक्षण भूमापक रंगेहात जाळ्यात

अल्पवयीन पीडितेवरील विनयभंग प्रकरणी आरोपीला तीन वर्षांची शिक्षा, पांढरकवडा विशेष न्यायालयाचा निकाल; पोक्सो कायद्यान्वये दोष सिद्ध

Leave a Comment