ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

संशयाच्या छायेत थरारक हत्या : विभक्त राहणाऱ्या महिलेचा गळा चिरून खून

On: May 18, 2026 3:21 PM
Follow Us:
---Advertisement---

गोपालपूर (कोलाम पोड) हादरले; पती संशयित ताब्यात, पोलिसांचा सर्व बाजूंनी तपास सुरू

✍️पांढरकवडा :  अशफाक खान


तालुक्यातील गोपालपूर येथील कोलाम पोड परिसर सोमवारी सकाळी एका निर्घृण हत्याकांडाने हादरून गेला. पतीपासून वेगळे राहत असलेल्या एका ५१ वर्षीय महिलेचा अज्ञात व्यक्तीने तीक्ष्ण धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि खळबळ पसरली आहे.

मृत महिलेचे नाव कमलाबाई हुसेन मेश्राम (वय ५१) असे असून त्या गोपालपूर येथील कोलाम पोड परिसरात राहत होत्या. प्राथमिक तपासात कौटुंबिक वाद आणि संशयातून ही हत्या झाल्याचा अंदाज  व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत महिलेचे पती हुसेन गड्डू मेश्राम (वय ५७) यांना संशयित म्हणून ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

🎯 पती-पत्नीमध्ये सतत वाद

माहितीनुसार, कमलाबाई आणि त्यांचे पती हुसेन मेश्राम यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सतत वाद होत होते. हुसेन मेश्राम हे पत्नीवर विविध कारणांवरून संशय घेत असल्याने घरात नेहमीच भांडणे होत होती. या मानसिक त्रासाला कंटाळून कमलाबाई यांनी पतीपासून वेगळे राहत स्वतंत्र वास्तव्य सुरू केले होते. त्या पतीच्या घरापासून अवघ्या दोन घरांच्या अंतरावर राहत होत्या.

मृत महिलेच्या भावाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, कमलाबाई यांचे दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध असल्याचा संशय पतीला होता. याच कारणावरून तो वारंवार पत्नीशी वाद घालत असे. त्यामुळे संशयातूनच हा खून घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

🎯 अंगणात रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह
दि.18 मे सोमवारी रोजी  सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गावातील सदाशिव वाघधरे यांच्या घराच्या अंगणात एका महिलेचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती मृत महिलेचे भाऊ चंद्रभान आत्राम यांना देण्यात आली. माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा कमलाबाई या अंगणात डाव्या बाजूला कोसळलेल्या अवस्थेत दिसून आल्या.

त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने खोल वार करण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. परिसरात रक्ताचे थारोळे साचले होते. हे दृश्य पाहून परिसरातील नागरिक भयभीत झाले.

🎯 मध्यरात्री ते पहाटेदरम्यान घडला प्रकार

ही हत्या रविवारी मध्यरात्री १ वाजेपासून सोमवारी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडल्याचा प्राथमिक अंदाज  व्यक्त करण्यात येत  आहे. घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील रमेश कुंटलवार यांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ पांढरकवडा पोलीस स्टेशन येथे संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराचा पंचनामा करून पुरावे संकलित केले तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. फॉरेन्सिक तपासणीसाठीही घटनास्थळाची पाहणी करण्यात आली.

🎯 सर्व बाजूंनी तपास सुरू

या हत्याकांडामुळे गोपालपूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी संशयित पतीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. मात्र हत्या नेमकी कोणत्या कारणातून आणि कोणत्या परिस्थितीत झाली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

पांढरकवडा पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून कौटुंबिक वाद, संशय, तसेच इतर वैयक्तिक कारणांचीही चौकशी करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवाल आणि तांत्रिक पुराव्यानंतर या प्रकरणातील सत्य अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पांढरकवड्यात हयात प्रमाणपत्र शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

पांढरकवडा पोलिसांची मोठी कामगिरी तीन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस; सराईत चोरट्यास अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

पांढरकवड्यात उपविभागीय पोलिस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या पथकाची धडक कारवाई

वणी-मारेगाव रस्त्यावर भीषण अपघात, मारेगावचे सचिन देवाळकर जागीच ठार; ओव्हरटेकच्या प्रयत्नात दोन चारचाकींची समोरासमोर भीषण धडक

कळंब भूमीअभिलेख कार्यालयात एसीबीची धडक कारवाई, फेरफार नोंदणीसाठी २५ हजारांची लाच घेताना परिरक्षण भूमापक रंगेहात जाळ्यात

अल्पवयीन पीडितेवरील विनयभंग प्रकरणी आरोपीला तीन वर्षांची शिक्षा, पांढरकवडा विशेष न्यायालयाचा निकाल; पोक्सो कायद्यान्वये दोष सिद्ध

Leave a Comment