ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

अल्पवयीन पीडितेवरील विनयभंग प्रकरणी आरोपीला तीन वर्षांची शिक्षा, पांढरकवडा विशेष न्यायालयाचा निकाल; पोक्सो कायद्यान्वये दोष सिद्ध

On: May 19, 2026 1:14 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा : अशफाक खान


अल्पवयीन मुलीशी विनयभंग करून धमकी दिल्याच्या गंभीर प्रकरणात पांढरकवडा येथील विशेष (अतिरिक्त सत्र) न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत तीन वर्षांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश श्री. एम. ए. कोठारी यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल १८ मे २०२६ रोजी दिला.
या प्रकरणात आरोपी दीपक देवराव बोरकर (वय २५), रा. अर्ली, ता. केळापूर, जि. यवतमाळ याच्याविरुद्ध पांढरकवडा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १०५५/२०१९ अन्वये भादंवि कलम ३५४, ३५४-अ, ३५४-ड, ५०६ (२) तसेच बाललैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम (पोक्सो) २०१२ च्या कलम १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरण विशेष सत्र प्रकरण क्रमांक ०६/२०२० म्हणून न्यायप्रविष्ट होते.

🎯 न्यायालयाने सुनावली अशी शिक्षा
न्यायालयाने आरोपी दीपक बोरकर याला विविध कलमांखाली पुढीलप्रमाणे शिक्षा ठोठावली —
🔺भादंवि कलम ३५४ अंतर्गत दोन वर्षे साधा कारावास व १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त साधा कारावास.
🔺भादंवि कलम ५०६ (२) अंतर्गत एक वर्ष सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावास.
🔺पोक्सो कायदा २०१२ च्या कलम १२ अंतर्गत तीन वर्षे साधा कारावास व ३ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास.
न्यायालयाने या सर्व शिक्षा एकत्र भोगण्याचे आदेश दिले.

🎯 काय होती घटना?
प्रकरणातील पीडिता ही घटनेच्या वेळी अल्पवयीन होती. ती  दि. 31.12. 2019 रोजी दुपारच्या सुमारास पैनगंगा नदीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी दीपक बोरकर हा रस्त्यावर उभा होता. पीडिता त्याच्या बाजूने पुढे गेल्यानंतर आरोपी तिच्या मागे गेला आणि तिचा डावा हात पकडून तिला जवळ ओढले. या झटापटीत तिच्या डोक्यावरचे कपड्यांचे टोपले खाली पडले.
घाबरलेल्या पीडितेने आरोपीला “मी तुझ्या बहिणीसारखी नाही का? मला सोड” अशी विनंती केली. तसेच “मी ही घटना माझ्या आई-वडिलांना सांगणार” असे म्हणताच आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्याचवेळी गावातील एक  महिला  या घटनास्थळी येताना दिसल्याने आरोपीने पीडितेचा हात सोडून तेथून पळ काढला.
यानंतर पीडितेने संपूर्ण प्रकार त्या महिलेने  यांना सांगितला. त्यांनी पीडितेला सुरक्षितपणे घरी पोहोचवले. घाबरलेल्या अवस्थेतील पीडितेने नंतर आईला संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांनी पांढरकवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

🎯 पोलिस तपासात आरोपीविरुद्ध सबळ पुरावे
तक्रारीनंतर तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके यांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपीविरुद्ध सबळ पुरावे उपलब्ध झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
या खटल्यात विशेष सत्र न्यायालयात अभियोजन पक्षातर्फे एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड. रमेश मोरे यांनी प्रभावी युक्तिवाद करत साक्षी आणि पुराव्यांच्या आधारे सरकारी पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली. न्यायालयाने अभियोजन पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीला दोषी ठरवले.
पैरवी अधिकाऱ्यांनी पाहिले कामकाज
या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर कुमरे पोलीस स्टेशन पांढरकवडा यांनी कामकाज पाहिले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पांढरकवड्यात हयात प्रमाणपत्र शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

पांढरकवडा पोलिसांची मोठी कामगिरी तीन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस; सराईत चोरट्यास अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

पांढरकवड्यात उपविभागीय पोलिस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या पथकाची धडक कारवाई

संशयाच्या छायेत थरारक हत्या : विभक्त राहणाऱ्या महिलेचा गळा चिरून खून

सिनेस्टाईल पाठलागानंतर ‘कंटेनर’ जेरबंद! मोहदा ढाबा परिसरात मध्यरात्री पोलिसांची धडक कारवाई; २५ गोवंशीय जनावरांची सुटका, १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

पांढरकवडा पंचायत समितीतील ‘मनरेगा’ विहीर योजनेत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून १५ हजारांपर्यंत लाच मागणी; मस्टर रोखून आर्थिक शोषण होत असल्याचा मनसेचा आरोप

Leave a Comment