ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

पांढरकवडा पोलिसांची  पाटणबोरी येथे मोठी कारवाई

On: May 27, 2026 10:41 AM
Follow Us:
---Advertisement---

कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या २८ गोवंश जनावरांची सुटका; ९.४० लाखांचा मुद्देमाल जप्त


✍️पांढरकवडा: अशफाक खान


पांढरकवडा पोलिसांनी गोवंश तस्करीविरोधात मोठी कारवाई करत २८ गोवंश जनावरांची सुटका केली असून तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🎯 गोपनीय माहितीवरून छापा

दि. २६ मे २०२६ मंगळवार रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता पांढरकवडा पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, पाटणबोरी ते मांडवी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत नदीकाठी काही गोवंश जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवण्यात आली आहेत. ही जनावरे तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथे नेण्याची तयारी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्री. एल. डी. तावरे यांनी तात्काळ पथक रवाना करून घटनास्थळी छापा टाकला.

🎯 २८ गोवंश जनावरांची सुटका

छाप्यामध्ये एका शेतात क्रूरतेने बांधून ठेवलेली एकूण २८ गोवंश जनावरे (बैल व गायी) आढळून आली. पोलिसांनी तत्काळ जनावरांची सुटका केली.

या कारवाईत:

🔺गोवंश जनावरे किंमत : ₹६,४०,०००

🔺पिकअप वाहन क्रमांक MH-22-AN-1278 किंमत : ₹३,००,०००

🔺एकूण जप्त मुद्देमाल : ₹९,४०,०००

जप्त करण्यात आलेली जनावरे पुढील देखभालीसाठी कोडवाडा नगर परिषद, पांढरकवडा यांच्या ताब्यात देण्यात आली आहेत.

🎯 आरोपींवर गुन्हा दाखल

या प्रकरणी खालील आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे:

🔺1. चंद्रकांत आत्राम (वय २२ वर्ष) – रा. पाटणबोरी ता.केळापूर

🔺2. अल्ताफ उर्फ मुद्दन शेख मन्नान (वय २८ वर्ष) – रा. पाटणबोरी ता. केळापूर

🔺3. शफी मुद्दसीर – रा. आदिलाबाद, तेलंगणा

आरोपींवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारित १९९५), प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० तसेच BNS कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🎯 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई:

पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता

अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात

सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रॉबीन बन्सल

यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक श्री. एल. डी. तावरे, पोउपनि. श्री. नितीन सुशीर तसेच गुन्हे शोध पथकातील  कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

या प्रकरणाचा पुढील तपास नापोको. सुनिल राठोड हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment