ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

मोमीन वेलफेअर फाऊंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; मुंतजीम खान इझहार खानचा जाहीर सत्कार

On: June 11, 2026 8:17 AM
Follow Us:
---Advertisement---

✍️पांढरकवडा : सारीम खान


पांढरकवडा येथील मोमीन वेलफेअर फाऊंडेशनच्या वतीने दि. १० जून रोजी शहरातील इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. जामा मस्जिद मैदानावर आयोजित या कार्यक्रमात विविध शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहरे-काझी तथा जामा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष काझी गजननफर अली हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुफ्ती इरशाद (इमाम, जामा मस्जिद पांढरकवडा), साजिद शरीफ (शिवसेना जिल्हा संघटक, यवतमाळ) तसेच निवृत्त प्राचार्य तय्यब पाशा सर सह इतर प्रमुख पाहुणे  मंचकावर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा उत्साहवर्धक सत्कार करण्यात आला.

यावेळी गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, पांढरकवडा येथील विद्यार्थी मुंतजीम खान इझहार खान याचाही या वेळी सन्मान करण्यात आला. मुंतजीमने मार्च २०२६ मध्ये झालेल्या सीबीएसई दहावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याच्या या यशाची दखल घेत मोमीन वेलफेअर फाऊंडेशनतर्फे त्याला प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून जाहीर सत्कार करण्यात आला.

याशिवाय शहरातील विविध शाळांतील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत कठोर परिश्रम, शिस्त आणि सातत्य यांच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मुंतजीम खानच्या या यशाबद्दल त्याचे पालक, शिक्षक व नातेवाईकांनी आनंद व्यक्त केला. तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केलेल्या या उपक्रमाबद्दल त्यांनी मोमीन वेलफेअर फाऊंडेशनचे आभार मानले.

सीबीएसई दहावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त करून यशाचा नवा मानदंड प्रस्थापित करणाऱ्या मुंतजीम खान इझहार खान याचे  अभिनंदन होत असून, त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment