ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आंदोलन; स्मार्ट मीटर सक्तीवरही तीव्र आक्षेप

On: June 22, 2026 10:50 AM
Follow Us:
---Advertisement---

अन्यायकारक दरवाढ तात्काळ मागे घ्या; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा – जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके

✍️चंद्रपूर : प्रतीनिधी


पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतींविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षा सौ. बेबीताई उईके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली तसेच वाढत्या महागाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

यावेळी आंदोलकांनी आरोप केला की, केंद्रातील भाजपा-एनडीए सरकारने सर्वसामान्य जनतेवर महागाईचे ओझे लादले आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात करण्यात आलेली २९ रुपयांची वाढ तसेच व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या किंमतीत झालेली वाढ ही सामान्य नागरिक, गृहिणी आणि लघु व्यावसायिकांसाठी आर्थिक संकट निर्माण करणारी असल्याचे त्यांनी म्हटले.

जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके यांनी सांगितले की, “जनतेला ‘अच्छे दिन’चे आश्वासन देणाऱ्या सरकारच्या कारभारामुळे आज सामान्य नागरिक महागाईच्या खाईत लोटला गेला आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या वाढीव दरांचा पुनर्विचार करून ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”

आंदोलनादरम्यान भारताचे पंतप्रधान यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

🎯 स्मार्ट मीटर सक्तीवर नाराजी

यावेळी महावितरणकडून लावण्यात येणाऱ्या स्मार्ट (इलेक्ट्रॉनिक) वीज मीटरच्या सक्तीविरोधातही आंदोलकांनी आवाज उठविला. या मीटरमुळे ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक वीजबिल येत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र शासनाने स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती तात्काळ थांबवावी, अशी मागणी करण्यात आली. या मागणीच्या समर्थनार्थ आंदोलकांनी प्रतीकात्मक स्मार्ट मीटरची होळी केली.

🎯 आदिवासी समाजाच्या प्रश्नांवरही भूमिका

यावेळी बोलताना बेबीताई उईके यांनी आदिवासी समाजाच्या प्रश्नांवरही भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, आदिवासी समाजाला ‘वनवासी’ म्हणून संबोधून त्यांच्या ऐतिहासिक व घटनात्मक अधिकारांपासून दूर करण्याचे प्रयत्न थांबवावेत. आदिवासी हे या देशाचे मूळ निवासी असून जल, जंगल आणि जमीन यांच्याशी त्यांचे पारंपरिक नाते आहे. आदिवासी समाजाच्या हक्कांवर कुठलाही आघात झाल्यास पक्षाच्या वतीने व्यापक जनआंदोलन उभारले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

🎯 मान्यवरांची उपस्थिती

या आंदोलनात आदिवासी सेल अध्यक्ष जनार्दन गेडाम, ॲड. पी. बी. वाकुडकर, प्रा. विठ्ठल मस्करी, परब गिरटकर, सुरज चव्हाण, दीपक कटकोजवार, आनंद तिराणकर, अरविंद परचाके, शोभाताई घरडे, उषा आत्राम, सरस्वती गावंडे, अनुप बेले, मदन उके, सिद्धार्थ मेश्राम, वामन वाटगुरे, परमेश्वर वाघमारे, मोरेश्वर बढोले, सोनुर्ले, सुनिता मडावी, सचिन पुजारे, आदित्य डेकाटे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment