ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

पांढरकवडा पोलिसांची  कारवाई : अवैध विदेशी दारूसह दोघांना अटक; अल्टो कारसह ₹1.08 लाखांचा मुद्देमाल जप्त

On: June 29, 2026 3:59 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️पांढरकवडा :  अशफाक खान


पांढरकवडा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे धाडसी कारवाई करत अवैधरित्या विदेशी दारूची तस्करी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत विदेशी दारूसह मारुती सुझुकी अल्टो कार असा एकूण ₹1,08,250 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या खात्रीलायक गोपनीय माहितीनुसार, दोन व्यक्ती सिल्व्हर रंगाच्या मारुती सुझुकी अल्टो (क्र. MH-29 AR-2653) या वाहनातून पांढरकवडाहून अर्ली (ता. केळापूर) येथे विक्रीसाठी विदेशी दारू घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तात्काळ कारवाई करत पाटणबोरी आरटीओ तपासणी नाका, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 येथे सापळा रचून वाहनाची तपासणी केली.

या कारवाईदरम्यान अजय देवराव तुमाने (वय 29, रा. घुबडी, ता. केळापूर) आणि सुरेश भास्कर ओसावार (वय 44, रा. अर्ली, ता. केळापूर) यांना ताब्यात घेण्यात आले.

🎯 जप्त करण्यात आलेला मुद्देमाल

🔺50 बाटल्या (180 मि.ली.) Officer’s Choice Blue विदेशी दारू – किंमत ₹11,000

🔺20 बाटल्या (180 मि.ली.) Royal Stag विदेशी दारू – किंमत ₹5,000

🔺2 लिटर क्षमतेची Officer’s Choice Blue विदेशी दारूची 1 प्लास्टिक बाटली – किंमत ₹2,250

अशा प्रकारे एकूण ₹18,250 किमतीची विदेशी दारू जप्त करण्यात आली. तसेच तस्करीसाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी अल्टो कार (किंमत ₹90,000) जप्त करण्यात आली असून, एकूण ₹1,08,250 किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(अ)(ई) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबीन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे, पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर, पोहेकॉ. प्रमोद जुनुनकर, पोहेकॉ. विलास जाधव, पोहेकॉ. रजनीकांत पाटील, नापोकॉ. सुनील राठोड, नापोकॉ. सचिन काकडे आणि पोलीस कॉन्स्टेबल राजू मुत्तलवार यांनी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment