ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

उपविभागीय पोलिस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या पथकाची   धडक कारवाई : जय भोले कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा; ६ जण ताब्यात, ₹१.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त

On: June 30, 2026 11:50 AM
Follow Us:
---Advertisement---

✍️पांढरकवडा :  अशफाक खान


पांढरकवडा शहरातील बसस्थानकाजवळील जय भोले कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पांढरकवडा उपविभागीय पोलिस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या पथकाने धाड टाकून सहा जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम व मोबाईल हँडसेटसह एकूण ₹१,८५,६०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दि. २९ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे २.०० वाजता कार्यालयीन पोलिस पथकाने बसस्थानकाजवळील जय भोले कॉम्प्लेक्समधील एका शटरच्या दुकानावर छापा टाकला. यावेळी काही व्यक्ती ५२ पत्त्यांच्या ‘एक्का बादशाह’ या पैशाच्या हारजितीच्या जुगारात गुंतलेले आढळून आले.

या कारवाईत खालील आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे:

🔺1. निखील शालीकराम बोरेले (वय २९), रा. भगतसिंग वॉर्ड, पांढरकवडा.

🔺2. रंजीत फुलसिंग चव्हाण (वय ४२), रा. ज्योतिबा फुले वॉर्ड, राममंदिरजवळ, पांढरकवडा.

🔺3. पंकज प्रदीप नेमनवार (वय ४०), रा. आकोली बु., ता. केळापूर.

🔺4. बाबाराव गणपत बोपटे (वय ५५), रा. गवराई, ता. केळापूर.

🔺5. मनीष कमल शर्मा (वय ४८), रा. शास्त्री वॉर्ड, पांढरकवडा.

🔺6. वैभव बापूराव गंजीवार (वय ३०), रा. मंगलमूर्ती लेआऊट, आखाडा वॉर्ड, पांढरकवडा.

छाप्यामध्ये आरोपींकडून रोख रक्कम ₹१,३५,६०० तसेच मोबाईल हँडसेट किंमत ₹५०,००० असा एकूण ₹१,८५,६०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी पांढरकवडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये कलम ४ व ५ अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता (यवतमाळ) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल (पांढरकवडा) यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईत पोहेकॉ. इमरान खान , पोहेकॉ. महेश नाईक , पोहेकॉ. प्रशांत चौकडे , पोहेकॉ. मनोज अभ्यंकर  आणि पोहेकॉ. रवि सिंहे  यांनी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment