🎯 तेलंगणातून आणलेल्या मुदतबाह्य औषधांवर नामांकित कंपन्यांचे बनावट स्टिकर्स लावून शेतकऱ्यांची फसवणूक; कृषी विभागाची धडक कारवाई
🔺पांढरकवडा | अशफाक खान
खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या आंतरराज्य रॅकेटचा कृषी विभागाने पर्दाफाश केला आहे. पांढरकवडा पंचायत समितीच्या कृषी विभागाने ३० जून रोजी मौजे खैरगाव (दे.), ता. केळापूर (पांढरकवडा), जि. यवतमाळ येथे धाड टाकून ₹17,82,135 किंमतीचा 2,285 किलो अवैध, मुदतबाह्य कीटकनाशके, रासायनिक खते व जैवउत्तेजकांचा साठा जप्त केला. या प्रकरणी यश गजानन शिवनवार (वय 26 वर्षे) याच्याविरुद्ध पांढरकवडा पोलीस ठाण्यात विविध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
🎯 गोपनीय माहितीवरून धाड
पांढरकवडा पंचायत समितीच्या कृषी विभागाला खैरगाव (दे.) येथे मोठ्या प्रमाणात अवैध कृषी निविष्ठांचा साठा करून त्याची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार कृषी अधिकारी सुरेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाने संशयित ठिकाणी छापा टाकला.
तपासणीदरम्यान आरोपीच्या राहत्या घरालगतच्या गोदामात मोठ्या प्रमाणात मुदतबाह्य व बेकायदेशीर कृषी निविष्ठांचा साठा आढळून आला. पंचांसमक्ष संपूर्ण मुद्देमाल जप्त करून सीलबंद करण्यात आला.
🎯 नामांकित कंपन्यांच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक
प्राथमिक तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. शेजारील तेलंगणा राज्यातील आदिलाबाद व सारखानी परिसरातून अत्यल्प दरात मुदतबाह्य व विनापरवाना कीटकनाशके आणली जात होती. त्यानंतर या औषधांच्या बाटल्या व डब्यांवर नामांकित कंपन्यांचे हुबेहूब बनावट स्टिकर्स लावून त्यांची पॅकिंग करण्यात येत होती.
ही बनावट औषधे नामांकित ब्रँडच्या नावाखाली शेतकऱ्यांना जास्त दराने विकली जात असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक तर होतच होती, शिवाय पिकांच्या उत्पादनालाही गंभीर धोका निर्माण होत होता.

🎯 जप्त मुद्देमालाचा तपशील
एकूण जप्त साठा : 2,285 किलो
एकूण किंमत : ₹17,82,135
1) मुदतबाह्य कीटकनाशके
– Swag
– Sprint
– Cretta
– Cohigan
– Chalopro 44
– Stigma
– Chemstar
एकूण वजन: 358.55 किलो
किंमत: ₹8,00,491
2) अनधिकृत रासायनिक खते
– NPK 10:8:34:2
– WS 19:19:19
– NPK 11:0:37
– Biofertilizer Rizomica
– Sujala 19:19:19
एकूण वजन: 1,735 किलो
किंमत: ₹4,56,050
3) जैवउत्तेजके (Biostimulants)
– Natuorock
– Bi-Nutri Seaweed
– Terminator II
– Anand Vishwas Plus
– Vital Plant Tonic
– TUNTUN Growth Promoter
एकूण वजन: 188.15 किलो
किंमत: ₹5,22,594

🎯 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
आरोपी यश गजानन शिवनवार याच्याविरुद्ध पांढरकवडा पोलीस स्टेशन येथे खालील कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
– Insecticides Act, 1968 – कलम 13(1), 18, 29
– Insecticides Rules, 1971 – नियम 10(3), 10(4), 10(C), 15, 36, 37, 38, 39
– Essential Commodities Act, 1955 – कलम 3 व 7
– Fertilizer (Control) Order, 1985 – कलम 35(1), 7, 8, 11 व 5
🎯 कारवाई करणारे अधिकारी
या धाडीत खालील अधिकारी सहभागी होते –
– प्रवीण जाधव – मोहीम अधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हास्तरीय भरारी पथक, यवतमाळ
– धीरज मोहेकर – जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक तथा सचिव, भरारी पथक
– सुरेश चव्हाण – कृषी अधिकारी, पांढरकवडा
– रुपाली इंगळे – कृषी अधिकारी (गुणनियंत्रण)
– राहुल डाखोरे – कृषी अधिकारी, पंचायत समिती कळंब
– निलेश भोयर – कृषी अधिकारी, पंचायत समिती कळंब
– सुरेश बुटले – कृषी अधिकारी, मारेगाव
– राहुल डंभारे – विस्तार अधिकारी, केळापूर
🎯 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली –
– सुनील बोरकर – संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण), महाराष्ट्र राज्य
– गणेश घोरपडे – विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग
– प्रवीण देशमुख – मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, महाराष्ट्र राज्य
– मनोज ढगे – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ
– लहूदास आडे – कृषी विकास अधिकारी, यवतमाळ
– नितीन लोखंडे – तंत्र अधिकारी, अमरावती
– संजय पाटील – विभागीय गुणनियंत्रण निरीक्षक, अमरावती
🎯 कृषी विभागाचा इशारा
कृषी विभागाने शेतकऱ्यांना केवळ परवानाधारक विक्रेत्यांकडूनच बियाणे, कीटकनाशके, खते व जैवउत्तेजके खरेदी करावीत, खरेदीची पावती जतन करावी आणि संशयास्पद अथवा मुदतबाह्य कृषी निविष्ठांची माहिती तात्काळ कृषी विभागाला द्यावी, असे आवाहन केले आहे.
🎯 शेतकऱ्यांची मागणी
या प्रकरणामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, या आंतरराज्य रॅकेटमागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच अशा बनावट कृषी निविष्ठांच्या विक्रीवर कायमस्वरूपी आळा घालावा, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे
.










