ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

आठवडी बाजार परिसरात जुगार अड्ड्यावर पांढरकवडा पोलिसांची धाड; आठ जण ताब्यात, ₹७७,२०० चा मुद्देमाल जप्त

On: July 1, 2026 2:40 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️पांढरकवडा :  अशफाक खान


पांढरकवडा शहरातील आठवडी बाजार परिसरात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर पांढरकवडा पोलिसांनी धाड टाकून आठ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण ₹७७,२०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार राम राठोड व पोलीस हवालदार उमेश कुमरे हे पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असताना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीलायक माहिती मिळाली. त्यानुसार, आठवडी बाजार परिसरात काही व्यक्ती पैशांची बाजी लावून “हार-जीतचा एक्का बादशहा” नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पथक तयार करण्यात आले.

त्यानंतर पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमाकांत खंदारे, पोलीस उपनिरीक्षक सचिन रघुपती, पोलीस हवालदार राम राठोड, उमेश कुमरे, नापोका संदीप मडावी व पोलीस शिपाई निखलेश चव्हाण यांनी घटनास्थळी छापा टाकला. या कारवाईदरम्यान आठ आरोपी प्रत्यक्ष जुगार खेळताना आढळून आले.

🎯 ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

1. सुभाष रामलू कर्मावार (रा. शिवाजी पुतळा जवळ, पांढरकवडा)

2. शेख रफिक शेख रसीद (रा. पांढरकवडा)

3. अनिल देविदास कोडापे (रा. इंदिरानगर, पांढरकवडा)

4. बंडू सिताराम बाभुळकर (रा. इंदिरानगर, पांढरकवडा)

5. नितीन यशवंत वानखडे (रा. कुंदन नगर, पांढरकवडा)

6. सुरेश शंकर सातपुते (रा. सावतेली वॉर्ड, पांढरकवडा)

7. रवि बोलेनवार (रा. पांढरकवडा)

8. महेंद्र कर्णवार (रा. पांढरकवडा)

कारवाईदरम्यान आरोपींकडून ₹५०,२०० रोख रक्कम तसेच ₹२२,००० किमतीचे मोबाईल फोन असा एकूण ₹७७,२०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ४९ अन्वये पांढरकवडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता (यवतमाळ), अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमाकांत खंदारे, पोलीस उपनिरीक्षक सचिन रघुपती, पोलीस हवालदार राम राठोड, उमेश कुमरे, नापोका संदीप मडावी व पोलीस शिपाई निखलेश चव्हाण यांनी सक्रिय सहभाग घेतला.

पांढरकवडा पोलिसांनी शहरातील अवैध जुगार, सट्टा व इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment