ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

पाटणबोरीत वरली मटका अड्ड्यावर पोलिसांचा धडक छापा; दोन स्वतंत्र कारवायांत पाच आरोपींवर गुन्हे, ५२ हजारांहून अधिक मुद्देमाल जप्त

On: July 3, 2026 12:12 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️पांढरकवडा: अशफाक खान


केळापूर तालुक्यातील पाटणबोरी येथील चन्नावार कॉम्प्लेक्सच्या मागील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या वरली मटका जुगार अड्ड्यावर पांढरकवडा पोलिसांनी धडक कारवाई करत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत पाच आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यातील कलम 12(अ) तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम 49 अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले असून, रोख रक्कम, मटका साहित्य आणि मोबाईल फोनसह ५२ हजार रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, पाटणबोरी येथील चन्नावार कॉम्प्लेक्सच्या मागील परिसरात काही जण वरली मटका जुगार चालवत असून नागरिकांकडून पैसे स्वीकारून हार-जीतचा अवैध जुगार खेळवला जात आहे. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने छापा टाकला.

छाप्यादरम्यान पोलिसांची चाहूल लागताच अनेक जुगारी घटनास्थळावरून पळून गेले. मात्र पोलिसांनी पाठलाग करून काही आरोपींना ताब्यात घेतले. पंचांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या अंगझडतीत जुगाराचे साहित्य, रोख रक्कम आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले.

🎯 पहिल्या कारवाईत दोघांविरुद्ध गुन्हा

पहिल्या प्रकरणात गणेश अशोक मिलगीलवार (वय 46, रा. सरदार पटेल वार्ड, पांढरकवडा) याच्या ताब्यातून 1,560 रुपये रोख, वरली मटका लिहिण्याचे बुक, आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आला.

चौकशीदरम्यान गणेश मिलगीलवार याने दररोज 300 रुपयांच्या मोबदल्यावर मोनू उर्फ जयसिंग भगवानसिंग ठाकूर (वय 38, रा. पाटणबोरी) याच्यासाठी वरली मटका लिहिण्याचे काम करत असल्याची कबुली दिली. त्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

🎯 दुसऱ्या कारवाईत तिघे जाळ्यात

दुसऱ्या कारवाईत शेख रशीद शेख नूर मिया (वय 60, रा. वरलक्ष्मी नगर, आदिलाबाद) आणि दिलीप भिमराव टेकाम (वय 30, रा. धमरगोटा, ता. केळापूर) यांना ताब्यात घेण्यात आले.

शेख रशीद याच्याकडून 985 रुपये रोख, मटका साहित्य आणि सुमारे 23 हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल जप्त करण्यात आला. तर दिलीप टेकाम याच्याकडून 1,190 रुपये रोख, मटका साहित्य आणि 26 हजार रुपये किमतीचा व्हिवो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल जप्त करण्यात आला. या कारवाईत एकूण 51,175 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

चौकशीदरम्यान दोघांनीही दररोज 300 रुपयांच्या मोबदल्यावर अशोक मोहनलाल परसुया रॉय (वय 59, रा. पांढरकवडा) याच्यासाठी वरली मटका लिहिण्याचे काम करत असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार अशोक परसुया रॉय याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला.

🎯 पंचांसमक्ष कारवाई

पंचांसमक्ष जप्ती पंचनामा करून सर्व मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

🎯 गुन्ह्यांचा तपास सुरू

या दोन्ही प्रकरणांमध्ये पांढरकवडा पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 12(अ) तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम 49 अन्वये गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास पोलीस हवालदार गजानन पत्रे आणि पोलीस नाईक किशोर आडे करीत आहेत.

पांढरकवडा पोलिसांनी अवैध जुगार व्यवसायाविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले असून, अशा प्रकारचे अवैध धंदे चालविणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पांढरकवडा पोलिसांकडून चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत; आरोपीला कोरपना जि.चंद्रपूरातून अटक

चार वर्षांच्या न्यायालयीन लढाईचा शेवट; खुनाच्या आरोपातून राकेश केवट निर्दोष मुक्त

सगणापूरमध्ये भीषण आग; शॉर्टसर्किटचा संशय, गरीब शेतमजुराचे घर व संपूर्ण संसार जळून खाक

चोरीस गेलेली दुचाकी अवघ्या काही दिवसांत हस्तगत; दोन आरोपी पांढरकवडा पोलिसांच्या ताब्यात

सहा. पोलीस अधीक्षक रॉबिन बन्सल यांच्या पथकाची  सलग दुसरी धडक कारवाई; आठवडी बाजारातील वरली मटका अड्ड्यावर छापा, सहा जण ताब्यात – ₹31,200 चा मुद्देमाल जप्त

एकुलत्या एक लेकीने निभावले पुत्रकर्तव्य; स्व. दिपक होले यांच्या कन्या तपस्या बुधे यांचे आकस्मिक निधन, हिंगणघाट येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

Leave a Comment