ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

सहा. पोलीस अधीक्षक रॉबिन बन्सल यांच्या पथकाची  सलग दुसरी धडक कारवाई; आठवडी बाजारातील वरली मटका अड्ड्यावर छापा, सहा जण ताब्यात – ₹31,200 चा मुद्देमाल जप्त

On: July 4, 2026 1:28 AM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा : अशफाक खान


पांढरकवडा शहरातील अवैध जुगार व्यवसायाविरोधात सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या पथकाने सलग दुसरी  धडक कारवाई करत शहरातील आठवडी बाजार परिसरातील वरली मटका अड्ड्यावर छापा टाकला. शुक्रवारी (दि. ३ जुलै २०२६) दुपारी करण्यात आलेल्या या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या ताब्यातून वरली मटका जुगाराचे साहित्य, रोख रक्कम आणि अन्य साहित्य असा एकूण ₹31,200 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील अवैध मटका व्यवसाय चालविणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.चार दिवसापूर्वीच या पथकाने दि.29 जुन रोजी येथील बस स्टँड समोरील जय भोले  कॉम्प्लेक्स मधील कथित जुगार अड्ड्यावर छापा टाकून मोठ्या प्रमाणात रोख रकमेसह सहा आरोपींना ताब्यात घेतले होते.

पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, पांढरकवडा येथील आठवडी बाजार परिसरात काही व्यक्ती वरली मटका नावाचा जुगार खेळवत असून तेथे मोठ्या प्रमाणात पैशांची बेकायदेशीर उलाढाल सुरू आहे. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचत दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास संबंधित ठिकाणी धाड टाकली.

छाप्यादरम्यान काही व्यक्ती प्रत्यक्ष वरली मटका जुगार खेळताना व खेळविताना आढळून आल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सर्वांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.

🎯 ताब्यात घेण्यात आलेले आरोपी

🔺बंडू सिताराम बांभुळकर (वय ५४), रा. इंदिरानगर, पांढरकवडा

🔺सुभाष नारायण पवार (वय ४१), रा. वांजरी, ता. केळापूर

🔺सचिन शामराव कांबळे (वय ३०), रा. सायखेडा (बु.), ता. केळापूर

🔺शहबाज शेख हमीद (वय २६), रा. इंदिरानगर, पांढरकवडा

🔺बुधाराम निळकंठ सामृतवार (वय ४४), रा. किन्ही नंदपूर, ता. केळापूर

🔺आशिष राम चवरे (वय ३२), रा. आठवडी बाजार, पांढरकवडा

या प्रकरणी पांढरकवडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपींकडून पुढील चौकशी केली जात आहे. या अवैध जुगार अड्ड्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही पोलीस सखोल तपास करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता (यवतमाळ) तसेच सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल (पांढरकवडा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोहेकॉ इमरान खान, पोहेकॉ महेश नाईक, पोहेकॉ प्रशांत चौकडे, पोहेकॉ मनोज अभ्यंकर आणि पोहेका रवि सिंहे यांनी सक्रिय सहभाग घेतला.

🎯 अवैध धंद्यांविरोधातील मोहिमेला वेग

गेल्या काही दिवसांपासून पांढरकवडा शहरात अवैध जुगार, सट्टा व इतर बेकायदेशीर व्यवसायांविरोधात पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली असून, सलग होत असलेल्या कारवायांमुळे अवैध धंदे चालविणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आगामी काळातही अशाच धडक कारवाया सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

सायबर गुन्हेगारांना बँक खाते विकणे पडले महाग; पांढरकवड्यात ‘म्युल अकाउंट’ प्रकरणी दोघांना अटक, ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

फोनवरील एका ओटीपीने उडाले १.८० लाख रुपये; पाटणबोरीतील डॉक्टर सायबर फसवणुकीचे बळी

९७ लाखांच्या मोहदा ज्वेलर्स चोरीप्रकरणी मोठी प्रगती; पुणे टोळीतील दोघे जेरबंद, चार आरोपींसह मुद्देमालाचा तीन राज्यांत शोध

सुन्ना येथील ‘रोअर रिसॉर्ट’वर पांढरकवडा पोलिसांची धाड; एक्का-बादशाह जुगारावर मोठी कारवाई, आदिलाबादचे ९ जण ताब्यात, ₹37.24 लाखांचा मुद्देमाल जप्त

CEIR पोर्टलच्या माध्यमातून पांढरकवडा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; हरविलेले व चोरीस गेलेले ३० मोबाईल मालकांच्या ताब्यात, ₹४.१८ लाखांचा मुद्देमाल परत

पाटणबोरीत पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर पांढरकवडा पोलिसांची धाड; ८ जण ताब्यात, ₹१.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Comment