ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

चार वर्षांच्या न्यायालयीन लढाईचा शेवट; खुनाच्या आरोपातून राकेश केवट निर्दोष मुक्त

On: July 5, 2026 2:59 PM
Follow Us:
---Advertisement---

अॅड. सिद्धार्थ एम. लोढा यांच्या प्रभावी युक्तिवादानंतर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय


✍️पांढरकवडा : अशफाक खान


सुमारे चार वर्षे न्यायालयीन कोठडीत राहिलेल्या राकेश बाबूलाल केवट याची अखेर खुनाच्या गंभीर गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाली आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, केळापूर श्री. एम. ए. कोठारी यांनी ४ जुलै २०२६ रोजी दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालात, अभियोजन पक्ष आरोपीविरुद्धचा आरोप वाजवी शंकेपलीकडे सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे स्पष्ट नमूद करत राकेश केवट याची निर्दोष मुक्तता केली. तसेच, अन्य कोणत्याही गुन्ह्यात त्याची आवश्यकता नसल्यास त्याला तात्काळ मुक्त करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

या निकालामुळे तब्बल चार वर्षे न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या आरोपीला मोठा दिलासा मिळाला असून, कायद्याच्या दृष्टीने ठोस व विश्वासार्ह पुराव्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

🎯 २०२२ मधील खुनाच्या प्रकरणाची पार्श्वभूमी

सन २०२२ मध्ये वणी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार राजू नावाच्या व्यक्तीचा दगडाने डोक्यावर वार करून खून करण्यात आल्याचा आरोप होता. या प्रकरणात मृताचा भाऊ अशोक याने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याचा दावा करत फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी राकेश बाबूलाल केवट याला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठविले. जामीन मंजूर न झाल्यामुळे तो संपूर्ण खटल्यादरम्यान कारागृहातच राहिला.

🎯 सरकारी पक्षाचा आरोप सिद्ध करण्याचा प्रयत्न

तपास पूर्ण झाल्यानंतर प्रकरण सत्र न्यायालयात सुनावणीस आले. सरकारी पक्षाने विविध साक्षीदार, पंचनामे, वैद्यकीय अहवाल आणि इतर कागदोपत्री पुराव्यांच्या आधारे आरोपीविरुद्ध खुनाचा आरोप सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.

🎯अॅड. सिद्धार्थ एम. लोढा यांची प्रभावी बाजू ठरली निर्णायक

आरोपीच्या बचावासाठी अॅड. सिद्धार्थ एम. लोढा यांनी अत्यंत सखोल आणि प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांनी सरकारी साक्षीदारांची विस्तृत उलटतपासणी करत त्यांच्या जबाबांमधील विसंगती, पुराव्यातील त्रुटी, तपासातील उणिवा आणि घटनाक्रमातील गंभीर शंका न्यायालयासमोर ठळकपणे मांडल्या.

त्यांनी आपल्या कायदेशीर युक्तिवादातून अभियोजन पक्षाने सादर केलेला पुरावा हा दोष सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर कसोटीवर टिकत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. बचाव पक्षाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा न्यायालयाने गांभीर्याने विचार केला.

🎯 न्यायालयाचे स्पष्ट निरीक्षण

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध संपूर्ण पुराव्याचा बारकाईने विचार केल्यानंतर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. एम. ए. कोठारी यांनी अभियोजन पक्ष आरोपीचा दोष वाजवी शंकेपलीकडे सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे नमूद केले. परिणामी राकेश बाबूलाल केवट याची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

न्यायालयाने आदेशात असेही स्पष्ट केले की, आरोपी अन्य कोणत्याही गुन्ह्यात आवश्यक नसल्यास त्याची तात्काळ मुक्तता करण्यात यावी.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

सायबर गुन्हेगारांना बँक खाते विकणे पडले महाग; पांढरकवड्यात ‘म्युल अकाउंट’ प्रकरणी दोघांना अटक, ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

फोनवरील एका ओटीपीने उडाले १.८० लाख रुपये; पाटणबोरीतील डॉक्टर सायबर फसवणुकीचे बळी

९७ लाखांच्या मोहदा ज्वेलर्स चोरीप्रकरणी मोठी प्रगती; पुणे टोळीतील दोघे जेरबंद, चार आरोपींसह मुद्देमालाचा तीन राज्यांत शोध

सुन्ना येथील ‘रोअर रिसॉर्ट’वर पांढरकवडा पोलिसांची धाड; एक्का-बादशाह जुगारावर मोठी कारवाई, आदिलाबादचे ९ जण ताब्यात, ₹37.24 लाखांचा मुद्देमाल जप्त

CEIR पोर्टलच्या माध्यमातून पांढरकवडा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; हरविलेले व चोरीस गेलेले ३० मोबाईल मालकांच्या ताब्यात, ₹४.१८ लाखांचा मुद्देमाल परत

पाटणबोरीत पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर पांढरकवडा पोलिसांची धाड; ८ जण ताब्यात, ₹१.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Comment