ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

पांढरकवडा पोलिसांकडून चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत; आरोपीला कोरपना जि.चंद्रपूरातून अटक

On: July 8, 2026 5:09 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️पांढरकवडा | अशफाक खान

पांढरकवडा पोलिसांनी चोरीस गेलेली मोटारसायकलचा शोध लावून आरोपीला अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे ही यशस्वी कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश लक्ष्मण पारिसे (रा. मोजरी, ता. हिंगणघाट) यांनी २ जुलै २०२६ रोजी पांढरकवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ७.३० या कालावधीत मनापूरम गोल्ड एनबीएफसी, जिडडेवार भवन, पांढरकवडा समोरील पार्किंगमधून त्यांची हिरो एचएफ डिलक्स (क्र. एमएच-३२-एएन-२९७५) ही सुमारे ३० हजार रुपये किमतीची मोटारसायकल अज्ञात व्यक्तीने चोरून नेली.

या प्रकरणी पांढरकवडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ८५४/२०२६ अन्वये कलम ३०३(२), भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

🎯 सीसीटीव्ही व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध

पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने (डीबी पथक) घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच गोपनीय माहितीदारांच्या मदतीने आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपासाची दिशा निश्चित करण्यात आली.

तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमधील संशयिताची ओळख आकाश नारायण शेरफुरे (रा. पारधीगुडा, ता. कोरपना, जि. चंद्रपूर) अशी पटली. त्यानंतर पोलिसांनी कोरपना येथे सापळा रचून आरोपीला चोरीस गेलेल्या मोटारसायकलसह ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपीने मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली असून चोरीस गेलेले वाहन जप्त करण्यात आले आहे.

🎯 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबीन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे, सपोनि. रमाकांत खंडारे, पोउपनि. नितीन सुशीर, पोहेकॉ. प्रमोद जुनुकर, पोहेकॉ. विलास जाधव, पोहेकॉ. रजनीकांत पाटील, नापोकॉ. सुनिल राठोड, नापोकॉ. सचिन काकडे आणि पोकॉ. राजू मुत्तलवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. राहुल भगत व पोकॉ. राजू कुकुडे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

सायबर गुन्हेगारांना बँक खाते विकणे पडले महाग; पांढरकवड्यात ‘म्युल अकाउंट’ प्रकरणी दोघांना अटक, ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

फोनवरील एका ओटीपीने उडाले १.८० लाख रुपये; पाटणबोरीतील डॉक्टर सायबर फसवणुकीचे बळी

९७ लाखांच्या मोहदा ज्वेलर्स चोरीप्रकरणी मोठी प्रगती; पुणे टोळीतील दोघे जेरबंद, चार आरोपींसह मुद्देमालाचा तीन राज्यांत शोध

सुन्ना येथील ‘रोअर रिसॉर्ट’वर पांढरकवडा पोलिसांची धाड; एक्का-बादशाह जुगारावर मोठी कारवाई, आदिलाबादचे ९ जण ताब्यात, ₹37.24 लाखांचा मुद्देमाल जप्त

CEIR पोर्टलच्या माध्यमातून पांढरकवडा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; हरविलेले व चोरीस गेलेले ३० मोबाईल मालकांच्या ताब्यात, ₹४.१८ लाखांचा मुद्देमाल परत

पाटणबोरीत पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर पांढरकवडा पोलिसांची धाड; ८ जण ताब्यात, ₹१.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Comment