ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

सहा.पोलिस अधिक्षक रॉबिन बन्सल यांच्या पथकाची मोठी कारवाई; कत्तलीसाठी हैदराबादकडे नेली जात असलेली २० गोवंश जनावरे व ५ पिकअप वाहने जप्त, ७ आरोपींवर गुन्हे दाखल

On: July 14, 2026 7:24 AM
Follow Us:
---Advertisement---

✍️पांढरकवडा :  अशफाक खान


केळापूर तालुक्यातील अर्ली परिसरात पांढरकवडा पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत कत्तलीसाठी हैदराबाद येथे अवैधरित्या वाहतूक केली जात असलेली २० गोवंश जनावरे व पाच महिंद्रा पिकअप वाहने जप्त केली. या कारवाईत सुमारे २५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सात आरोपींविरुद्ध विविध कायद्यांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १२ जुलै २०२६ रोजी रात्री गोपनीय माहितीच्या आधारे अर्ली (ता. केळापूर) येथील पारवा–पिंपळखुटी मार्गावर सापळा रचण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, काही महिंद्रा पिकअप वाहनांमधून गोवंश जनावरे अत्यंत अमानुष पद्धतीने दोरीने बांधून कत्तलीसाठी हैदराबाद येथे नेण्यात येत होती.

माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी संशयित वाहनांना अडवून तपासणी केली असता, MH-36-F-2379, MH-29-BE-8554, MH-37-B-1687, MH-26-PD-5540 आणि MH-29-T-5677 या पाच लहान मालवाहू वाहनांमध्ये एकूण २० गोवंश जनावरे कोंबून बांधलेल्या अवस्थेत आढळून आली.

पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे २ लाख रुपये किमतीची गोवंश जनावरे तसेच २३ लाख रुपये किमतीची पाच वाहने असा एकूण २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणात खालील सात आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे :

🔺1. अस्लम मुनिर खान पठाण (वय ३१), रा. घाटी, ता. घाटंजी

🔺2. शेख तालीब शेख इरफान (वय २९), रा. राजीव गांधी चौक, घाटंजी

🔺3. शेख रज्जाक शेख बशीर (वय ३८), rा. सावरगाव, ता. घाटंजी

🔺4. गुलाब बाबाराव चौधरी (वय ३९), रा. सावरगाव, ता. घाटंजी

🔺5. मोसीम मुनिर खान पठाण (वय २९), रा. घाटंजी

🔺6. शेख साहील शेख हमीद (वय २६), रा. राजीव गांधी चौक, घाटंजी

🔺7. शेख सोहेल शेख हमीद (वय २९), रा. राजीव गांधी चौक, घाटंजी

या सर्व आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे भारतीय न्याय संहिता कलम ३(५) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, १९७६ (सुधारित १९९५) मधील कलम ५, ५(अ), ५(ब) आणि प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करणारा अधिनियम, १९६० मधील कलम ११(१) अन्वये दोन स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता (यवतमाळ) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या नेतृत्वात पार पडली.

कारवाई यशस्वी करण्यासाठी पोहेकॉ. इमरान खान , पोहेकॉ. प्रशांत चौकडे  आणि पोहेकॉ. रवि सिंहे यांनी विशेष परिश्रम घेतले.

या कारवाईमुळे केळापूर तालुक्यात अवैध गोवंश वाहतुकीवर पोलिसांनी मोठा आळा घातला असून, अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पेपरफुटीविरोधात पांढरकवड्यात युवा टायगर फोर्सचा एल्गार; शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी एसडीओ कार्यालयावर भव्य मोर्चा

दोन बैल चोरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश; पांढरकवडा पोलिसांची मोठी कारवाई, 6 आरोपी जेरबंद – ₹10.05 लाखांचा मुद्देमाल जप्त

निवडणूक आयोगाच्या ‘SIR’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर मनसेची संघटनात्मक मोर्चेबांधणी; वणी ते अमरावतीत राजू उंबरकर यांच्या बैठकींचा धडाका

मोहदा येथे 97 .50 लाखांचा दरोडा; ‘राजेंद्र ज्वेलर्स फोडले, चार मुखवटाधारी चोरटे दुचाकीवरून पसार

ऐतिहासिक पायी वारी पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; युवा टायगर फोर्सच्या जनजागृतीमुळे तालुकाभर भक्तिमय वातावरण, विविध समित्यांची घोषणा

पांढरकवड्यात पोलिसांची मोठी कारवाई : कत्तलीसाठी नेली जाणारी २७ जनावरे मुक्त; ₹२९.८० लाखांचा मुद्देमाल जप्त, चार आरोपींवर गुन्हे

Leave a Comment