ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

अपघातग्रस्तांचे प्राण वाचविणाऱ्या घाटंजी येथील ‘मुज्जू’ पटेल यांचा स्वातंत्र्यदिनी गौरव

On: August 15, 2026 7:57 AM
Follow Us:
---Advertisement---

सामाजिक कार्याची प्रशासनाकडून दखल; तहसीलदार विजय साळवे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान

✍️पांढरकवडा : अशफाक खान


घाटंजी येथील सामाजिक कार्यकर्ते मूजमिल (मुज्जू) पटेल यांच्या निस्वार्थ सामाजिक कार्याची प्रशासनाने दखल घेत स्वातंत्र्यदिनाच्या पावन पर्वावर त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला. तहसील कार्यालय, घाटंजी येथे आयोजित स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात तहसीलदार विजय साळवे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.

अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळवून देणे, जखमींना वेळेत रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न करणे आणि संकटाच्या प्रसंगी माणुसकीच्या भावनेतून धावून जाणे, या कार्यासाठी मूजमिल पटेल सातत्याने पुढाकार घेत आहेत. त्यांच्या या सेवाभावी कार्याची प्रशासनाने घेतलेली दखल त्यांच्या सामाजिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

सन्मानानंतर आपल्या भावना व्यक्त करताना मूजमिल पटेल म्हणाले, “समाजकार्य करताना कधीही सन्मान मिळावा, माझी वाहवा व्हावी किंवा माझे नाव व्हावे, हा विचार मनात ठेवला नाही. अपघाताची घटना घडली की, त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचा जीव कसा वाचवता येईल आणि त्याला लवकरात लवकर उपचार कसे मिळतील, एवढाच एक विचार मनात असतो.”

“एखाद्याचा जीव वाचविण्यापेक्षा मोठा सन्मान दुसरा कोणताही असू शकत नाही,” अशी मनापासूनची भावना त्यांनी व्यक्त केली. मात्र, प्रशासनाने त्यांच्या या छोट्या-छोट्या सामाजिक प्रयत्नांची दखल घेऊन प्रशस्तीपत्राद्वारे केलेला गौरव हा त्यांच्यासाठी अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा क्षण ठरला.

हा सन्मान केवळ एका प्रशस्तीपत्रापुरता मर्यादित नसून समाजासाठी अधिक चांगले आणि व्यापक कार्य करण्याची नवी ऊर्जा व जबाबदारी असल्याचेही पटेल यांनी सांगितले. “आज मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी अभिमानाचा विषय नसून समाजासाठी आणखी काहीतरी करण्याची प्रेरणा आहे. हा सन्मान माझ्या हृदयात कायम जपून ठेवेन आणि समाजसेवेची ही वाटचाल यापुढेही तितक्याच निस्वार्थ भावनेने सुरू ठेवेन,” असे त्यांनी नमूद केले.

तहसीलदार विजय साळवे आणि घाटंजी तहसील प्रशासनाने केलेल्या या सन्मानाबद्दल मूजमिल पटेल यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मिळालेला हा गौरव त्यांच्या सामाजिक कार्याला नवी दिशा आणि ऊर्जा देणारा ठरला आहे.

माणुसकीच्या भावनेतून कोणत्याही अपेक्षेशिवाय मदतीचा हात पुढे करणाऱ्या मूजमिल पटेल यांच्या कार्याचा झालेला हा गौरव समाजातील इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment