ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

हनुमान मंदिराजवळ दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू; पांढरकवड्यातील ऋत्वीक कोडापेवर काळाचा घाला

On: August 16, 2026 4:28 PM
Follow Us:
---Advertisement---

तातापूर–चालबर्डी मार्गावरील अपघातात २० वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत; मित्र गंभीर जखमी

✍️पांढरकवडा:  अशफाक खान


स्वातंत्र्यदिनाच्या सायंकाळी तातापूर ते चालबर्डी मार्गावर झालेल्या भीषण दुचाकी अपघातात पांढरकवडा येथील २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. हनुमान मंदिराजवळील वळणावर मोटारसायकल घसरून झालेल्या या दुर्घटनेत ऋत्वीक संतोष कोडापे याला डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेत त्याचा मित्र अनुराग तुमराम गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे.

मृतक ऋत्वीक संतोष कोडापे (वय अंदाजे २० वर्षे, रा. शाम नगरी, पांढरकवडा) हा युवक शिक्षण घेत होता. त्याच्या अपघाती मृत्यूने कुटुंबीय, मित्रपरिवार आणि परिसरात शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या सुमारास ऋत्वीक कोडापे आणि त्याचा मित्र अनुराग तुमराम (वय २२ वर्षे, रा. पांढरकवडा) हे अनुरागच्या यामाहा मोटारसायकल क्रमांक एमएच २९ सीसी ५३५७ वरून पांढरकवडा येथून तातापूर–चालबर्डी मार्गाने जात होते.

दरम्यान, हनुमान मंदिराजवळील वळणावर मोटारसायकल अचानक घसरली आणि दोघेही रस्त्यावर कोसळले. अपघातात ऋत्वीकच्या डोक्याला, गुडघ्याला तसेच हात-पायांना गंभीर दुखापत झाली. त्याच्यासोबत असलेला अनुरागही गंभीर जखमी झाला.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, पांढरकवडा येथे दाखल केले. मात्र, ऋत्वीकची प्रकृती अत्यंत गंभीर होती. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. नातेवाईक रुग्णालयात पोहोचले असता ऋत्वीकच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले.

🎯 कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

ऋत्वीकच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्याचा चुलत भाऊ प्रणय मधुकर कोडापे (वय २७ वर्षे, रा. आदर्श कॉलनी, पांढरकवडा) तसेच ऋत्वीकची आई  यांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालय गाठले. मात्र, तेथे ऋत्वीकचा मृत्यू झाल्याचे समजताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

या घटनेबाबत प्रणय कोडापे यांनी पांढरकवडा पोलीस ठाण्यात उपस्थित राहून जबानी रिपोर्ट दिला. त्यांच्या रिपोर्टवरून पोलिसांनी मर्ग क्रमांक ८९/२०२६, कलम १९४ BNSS अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

🎯 उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी

ऋत्वीकच्या मृतदेहाची १६ ऑगस्ट रोजी सकाळी पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.

दुपारनंतर अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली. सायंकाळी ४ वाजता पांढरकवडा येथील मोक्षधाम येथे ऋत्वीक कोडापे याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भावपूर्ण वातावरणात ऋत्वीकला अखेरचा निरोप देण्यात आला.

🎯 पांढरकवडा पोलिसांकडून तपास सुरू

या प्रकरणात पांढरकवडा पोलिसांनी मर्ग दाखल केला असून अधिक तपास पोलिस करत आहे.

प्राथमिक माहितीनुसार मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात ऋत्वीकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

अवघ्या २०व्या वर्षी ऋत्वीकचा झालेला दुर्दैवी मृत्यू हा कुटुंबीयांसाठी मोठा धक्का ठरला असून, त्याच्या अकाली जाण्याने पांढरकवडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment