ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

पांढरकवडा क्रीडा संकुलाचे काम गतीने पूर्ण करा; मैदान सरावासाठी लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी

On: August 24, 2026 1:35 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️पांढरकवडा : अशफाक खान


पांढरकवडा येथील तालुका क्रीडा संकुलाचे रखडलेले काम जलद गतीने पूर्ण करून क्रीडापटू आणि खेळाडूंना सरावासाठी मैदान लवकर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी ॲड. मुत्यालवार क्रिकेट क्लबच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवार, दि. २४ ऑगस्ट रोजी तालुका क्रीडा संकुलाचे सचिव तथा केळापूर तहसीलदार राजेंद्र इंगळे यांना निवेदन सादर केले.

पांढरकवडा परिसरातील अनेक युवक विविध क्रीडा प्रकारांमध्ये सक्रिय असून, क्रिकेटसह इतर खेळांचा नियमित सराव करणाऱ्या खेळाडूंची संख्या मोठी आहे. मात्र, क्रीडा संकुलाचे काम पूर्णत्वास न गेल्याने खेळाडूंना सरावासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होत नसल्याची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे संकुलाचे काम तातडीने पूर्ण करून मैदान खेळाडूंसाठी खुले करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

क्रीडा संकुल पूर्णपणे कार्यान्वित झाल्यास परिसरातील युवा खेळाडूंना दर्जेदार सरावाची सुविधा मिळण्यासोबतच त्यांच्या क्रीडा कौशल्याला वाव मिळणार आहे. त्यामुळे संबंधित विभागाने कामाच्या प्रगतीकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, अशी अपेक्षा क्रिकेट क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

निवेदन देताना ॲड. मुत्यालवार क्रिकेट क्लबचे अध्यक्ष ॲड. के.जी.मुत्यालवार, उपाध्यक्ष विजय कोंडावार, सचिव ताडपेल्लीवार, डॉ. नीलमवार तसेच क्लबचे अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रीडा संकुलाचे काम लवकर पूर्ण होऊन मैदान सरावासाठी उपलब्ध झाल्यास परिसरातील खेळाडूंना मोठा दिलासा मिळणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment