ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

हळद्वानीतील कथित ‘शुद्धीकरण’ प्रकरणाचा केळापूर काँग्रेसकडून निषेध

On: September 3, 2026 3:08 PM
Follow Us:
---Advertisement---

दोषींवर कायदेशीर कारवाईची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

✍️पांढरकवडा | अशफाक खान

उत्तराखंडातील हळद्वानी येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर सभास्थळाचे कथितरीत्या ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याच्या प्रकरणाचा केळापूर काँग्रेस कमेटीतर्फे तीव्र निषेध करण्यात आला. या घटनेची निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन गुरुवार, दि. ३ सप्टेंबर रोजी पांढरकवडा येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार दिला असून जात, धर्म किंवा सामाजिक स्थितीच्या आधारावर कोणताही भेदभाव मान्य नाही. अशा प्रकारच्या कथित कृतींमुळे सामाजिक समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांना धक्का पोहोचतो. त्यामुळे हळद्वानी येथील प्रकाराची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली.

या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून घटनेमागील व्यक्ती तसेच संबंधित संघटनांची भूमिका तपासण्यात यावी. दोषी आढळणाऱ्यांवर संविधान व प्रचलित कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. तसेच भविष्यात जातीय व सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडू नयेत, यासाठी प्रशासनाने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

निवेदन देताना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रेमदास राठोड, अमर पाटील, ॲड. अनिल किनाके, शहराध्यक्ष अनिस पोसवाल, मनोज भोयर, माजी नगर सेवक अ.करीम भाई यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment