ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

मोहदा आठवडी बाजारात अवैध दारूविक्रीवर पांढरकवडा पोलिसांची धाड; 25,730 रुपयांचा मुद्देमाल जप्त

On: September 2, 2026 12:30 PM
Follow Us:
---Advertisement---

106 पव्वे विदेशी दारूसह 5,830 रुपये रोख जप्त; 37 वर्षीय आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल

✍️पांढरकवडा : अशफाक खान


पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने मोहदा येथील आठवडी बाजार परिसरात अवैध दारूविक्रीविरोधात कारवाई करत एकूण 25,730 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत विदेशी दारूचे 106 पव्वे (180 मिली क्षमतेचे) आणि दारू विक्रीतून मिळालेली 5,830 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांढरकवडा पोलीस ठाण्याचे डी.बी. पथक मोहदा परिसरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना अवैध दारूविक्रीबाबत गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे मोहदा येथील आठवडी बाजार परिसरात छापा टाकण्यात आला.

या कारवाईदरम्यान अमोल मोरेश्वर दरवरकर (वय 37 वर्षे, रा. वॉर्ड क्र. 2, मोहदा) याच्या ताब्यातून विदेशी दारू जप्त करण्यात आली.

🎯 जप्त मुद्देमाल

  • Royal Stag विदेशी दारू — 180 मिली क्षमतेचे 40 पव्वे — किंमत ₹10,000
  • Master Delight विदेशी दारू — 180 मिली क्षमतेचे 66 पव्वे — किंमत ₹9,900
  • दारू विक्रीची रोख रक्कम — ₹5,830
  • एकूण जप्त मुद्देमाल — ₹25,730

पोलिसांनी पंचांसमक्ष जप्ती पंचनामा करून संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेतला. याप्रकरणी पोलीस हवालदार विलास जाधव यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून आरोपीविरुद्ध कलम 65(ई), महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🎯 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात आणि वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशिर, सहाय्यक फौजदार प्रमोद जुनुनकर, पोलीस हवालदार विलास जाधव, नाईक पोलीस कॉन्स्टेबल सुनिल राठोड, सचिन काकडे आणि पोलीस शिपाई राजू मुत्यालवार यांनी ही कारवाई केली.

पांढरकवडा पोलिसांच्या या कारवाईमुळे मोहदा परिसरातील अवैध दारूविक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईला आणखी बळ मिळाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

ग्रामसभा थांबली तर गावकऱ्यांनी प्रश्न विचारायचे तरी कोणाला?

शारदा ज्ञानपीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दोन दिवसीय ‘केशर साहित्य संमेलन’; २६ व २७ डिसेंबरला साहित्यिकांची मांदियाळी

हळद्वानीतील कथित ‘शुद्धीकरण’ प्रकरणाचा केळापूर काँग्रेसकडून निषेध

ज्येष्ठ नागरिकांच्या हक्क, समस्या व शासकीय योजनांवर मार्गदर्शन; जनसेवा प्रतिष्ठानचे वार्षिक संमेलन उत्साहात संपन्न

क्रीडा संकुलाच्या मैदानाचे काम जलद गतीने पूर्ण करण्याचे आमदार राजू तोडसाम यांचे निर्देश

युवा टायगर फोर्सच्या पाठपुराव्याला यश; पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती

Leave a Comment