ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

वाठोड्याच्या शेतातून जानू सेठ जिवानी यांची 25 हजारांची पाण्याची मोटार चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

On: September 28, 2026 12:59 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️पांढरकवडा | अशफाक खान

वाठोडा शेतशिवारातील एका शेतातून CRI कंपनीची जुनी वापरती पाण्याची मोटार चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. चोरी झालेल्या मोटारीची अंदाजे किंमत 25 हजार रुपये असल्याचे तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या जबानी रिपोर्टमध्ये नमूद केले आहे.

पोलिसांकडे दिलेल्या माहितीनुसार, पांढरकवडा कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जान मोहम्मद अब्दुल भाई ऊर्फ जानू सेठ जिवानी (वय 79), रा. चिंतामणी लेआऊट, पांढरकवडा, यांची वाठोडा शेतशिवारात सर्वे क्रमांक 12/2 मध्ये शेती आहे. ते शेती करून उपजीविका करतात.

26 सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे 6.30 वाजता जानू सेठ आणि त्यांचे सालगडी प्रविण बोटरे यांनी पाण्याची मोटार बंद करून शेतातून घरी परतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर 27 सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे 8.30 वाजता ते पुन्हा शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले असता नाल्यालगत ठेवलेली मोटार जागेवर दिसून आली नाही.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, मोटार दोराने बांधून ठेवण्यात आली होती; मात्र घटनास्थळी दोर कापलेल्या अवस्थेत आढळला. मोटारीला जोडलेले इलेक्ट्रिक वायरही कापलेले दिसून आले. त्यामुळे मोटार चोरीला गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

घटनेनंतर तक्रारदाराने आजूबाजूच्या परिसरातील तसेच गावातील काही व्यक्तींकडे मोटार चोरीबाबत विचारणा केली. मात्र त्यांना याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले.

तक्रारीनुसार, 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.30 ते 27 सप्टेंबर रोजी सकाळी 8.30 या कालावधीत अज्ञात व्यक्तीने अंधाराचा फायदा घेत सर्वे क्रमांक 12/2 मधील नाल्यालगतच्या शेतातून मोटार चोरी करून नेल्याचा संशय आहे.

या प्रकरणी पांढरकवडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment