ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

✦ तंबाखू तस्करीला मोठा आळा ✦पांढरकवडा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाईअवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यांवर धडक प्रतिबंधात्मक ऑपरेशन

On: November 15, 2025 5:01 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा: अशफाक खान
पांढरकवडा परिसरात अवैध सुगंधी तंबाखू आणि पानमसाला तस्करीला मोठ्या प्रमाणात आळा घालण्यासाठी पांढरकवडा पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेकडून संयुक्तरीत्या ऑलआउट ऑपरेशन राबविण्यात आले. पाटणबोरी परिसरात पोलिस पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही मोठी कारवाई करण्यात आली.

🎯 गोपनीय माहिती आणि नाकाबंदी

दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे ००.१० वाजता, पिंपळखुटी येथे आदिलाबादकडून येणाऱ्या सिल्व्हर रंगाच्या हुंडाई एक्ससेंट (MH 03 CH 0773) वाहनात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार लगेचच नाकाबंदी लावण्यात आली.

सुमारे रात्री 12.30 वाजता दरम्यान, संशयित वाहन नाकाबंदीजवळ दिसताच पोलिसांनी ते थांबविले. मात्र चालकाने पोलिसांकडे दुर्लक्ष करून वाहन थांबवले आणि जंगलाच्या दिशेने पळ काढला.

🎯 दोन आरोपी ताब्यात, एक फरार

वाहनातील उर्वरित दोन व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची नावे खालीलप्रमाणे :

🔺1. शोयब खान अफसर खान (वय ३१)


– व्यवसाय : पानठेला चालक
– रा. अबुबकर कॉलनी, अमरावती
– सध्या मुक्काम : पाटीपुरा, अमरावती

🔺2. अय्याज खान अक्तर खान (वय ३७)


– व्यवसाय : ऑटो चालक
– रा. जुन्या वस्ती, अलमास कॉलनी, बडनेरा, जि. अमरावती

चालक पळून गेलेल्या व्यक्तीची ओळख पुढीलप्रमाणे समोर आली :
सय्यद एजाज सय्यद गौस (वय ३६), रा. अस्मा कॉलनी, अमरावती — जो वाहन चालवित होता आणि ज्याने घटनास्थळावरून पळ काढला.

🎯 जप्त केलेला मोठा मुद्देमाल

वाहनाची तपासणी केली असता खालीलप्रमाणे अवैध सुगंधी तंबाखू व पान मसाला आढळला—

🔺१. HOT प्रीमियम पान मसाला

34 पाउच असलेली 26 पॅकेटची पांढऱ्या रंगाच्या 38 थैल्या

एकूण : 988 पॅकेट्स

एकूण किंमत : ₹1,34,368

🔺२. H-5 Premium Chewing Tobacco

34 पाउच असलेली 26 पॅकेटची 38 थैल्या

एकूण : 988 पॅकेट्स

एकूण किंमत : ₹33,592

 एकूण जप्त सुगंधी तंबाखू व पानमसाला माल : ₹1,67,960

तसेच खालील मालही जप्त :

हुंडाई एक्ससेंट कार – अंदाजे किंमत : ₹3,00,000

दोन मोबाइल फोन – एकूण किंमत : ₹20,000

 एकूण जप्त मुद्देमाल : ₹4,87,960

🎯 चौकशीतून उघड झालेली माहिती

आरोपींच्या चौकशीतून समोर आले की—

हा गुटखा माल आदिलाबाद येथून आणला गेला होता.

संपूर्ण माल अमरावतीकडे वाहतूक केली जात होती.

🎯 संयुक्त पथकाची उल्लेखनीय कामगिरी

ही कारवाई खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली—

श्री कुमार चिंता, पोलीस अधीक्षक, यवतमाळ

श्री अशोक बोरा, अपर पोलीस अधीक्षक

श्री रॉबिन बन्सल, उपविभागीय पोलीस अधिकारी

🔺पथकाचे नेतृत्व :

मा. पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा — श्री सतीश चवरे

मा. पोलीस निरीक्षक, पांढरकवडा — श्री दिनेश झांबरे

🔺पथकातील अधिकारी व कर्मचारी :

सपोनि सागर पेंडारकर

पोहेका निलेश निमकर

नापोका किशोर आडे

पोशि राजू बेलयवार

पोशि विकेश घ्यावतीवार

🎯 निष्कर्ष

पांढरकवडा पोलिसांनी केलेली ही कारवाई गुटखा माफियाविरुद्ध मोठा धक्का मानली जात आहे. जिल्ह्यातील अवैध तंबाखू तस्करीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांकडून अशा प्रकारचे ऑलआऊट ऑपरेशन पुढेही सुरू राहणार असल्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment