ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

पांढरकवडा नगरपरिषद निवडणूक 2025 : अर्ज छाननी पूर्ण, 112 उमेदवारांची नावे वैध; 11 नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात

On: November 21, 2025 6:22 AM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा : अशफाक खान

पांढरकवडा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेत महत्त्वाचा टप्पा असलेल्या नामनिर्देशन पत्रांच्या छाननीचे काम आज दिनांक 18 नोव्हेंबर 2025 (मंगळवार) रोजी पूर्ण झाले. नगर परिषद निवडणूक अधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर 2025 या कालावधीत एकूण 196 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती.

त्यापैकी आज झालेल्या काटेकोर छाननीनंतर 112 अर्ज वैध ठरले असून 84 अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. यात नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाचे उमेदवार समाविष्ट आहेत. वैध उमेदवारांची सुधारीत आणि विधिग्राह्य यादी अधिकृत पातळीवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

🎯 पुढील महत्वाचे टप्पे

अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : 21 नोव्हेंबर 2025

मतदानाचा दिवस : 2 डिसेंबर 2025

मतमोजणी : 3 डिसेंबर 2025

अर्ज मागे घेण्याची मुदत संपेपर्यंत प्रत्यक्ष रिंगणातील उमेदवारांची स्पष्ट आणि अंतिम आकडेवारी समोर येणार आहे. सध्या नगराध्यक्ष पदासाठी 11 उमेदवारांनी वैध पात्रता मिळवली असून आगामी निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

🎯 पांढरकवडा थेट नगराध्यक्ष निवडणूक 2025

छाननीत वैध ठरलेल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची यादी :

अ. क्र. उमेदवाराचे नाव

1. नेताम अंकुश उर्फ अंकित बबनराव
2. म्यानेवार मोहन पोषट्टी
3. नहाते अभिनय रामचंद्र
4. जुवारे गजानन ऋषीजी
5. बोरेले आतिश लक्ष्मण
6. उप्पलवार स्वप्नील विलासराव
7. तिवारी विनोदकुमार जमुनाशंकर
8. कायपेल्लीवार प्रकाश इस्तारी
9. कनाके किशोर दादाराव
10. बडे शंकर मनोहरपंत
11. तवर नौशाद नुरुद्दीन

🎯 उत्सुकता, चर्चा आणि राजकीय समीकरणांत उलथापालथ

पांढरकवड्यातील राजकीय मैदान आता अधिक रंगतदार बनले असून प्रत्येक पक्ष, गट आणि स्वतंत्र उमेदवारांमध्ये रणनीती, मतसंख्या, जाती-धर्म समीकरणे, तरुण मतदारांची पसंती, स्थानिक विकास मुद्दे यावर आधारित मोहिमेची आखणी सुरू आहे.

शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सेवा, रोजगार, नागरी सुविधा, कचरा व्यवस्थापन, स्मार्ट टाउनशिप, डिजिटल प्रशासन आणि तरुणांना प्रोत्साहन यासारख्या मुद्द्यांवर मतदारांकडून अपेक्षा व्यक्त होत आहेत.

🎯 संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक – प्रशासन

निवडणूक अधिकारी कार्यालयाने संपूर्ण प्रक्रिया योग्य, पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. पुढील निवडणूक टप्प्यांमध्ये आचारसंहिता, प्रचारनियमन, व्यय तपासणी आणि कायदेशीर अटींचा प्रभावीपणे लागू असणार आहे.

ही निवडणूक कोणाच्या बाजूने झुकते, कोणते नवे नेतृत्व उभे राहते, मतदार कोणावर विश्वास ठेवतात हे 2 आणि 3 डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment