✍️पांढरकवडा : अशफाक खान
पांढरकवडा नगर परिषद निवडणूक 2025 ची रणधुमाळी दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालली आहे. शहरातील राजकीय वातावरणात चढत्या तापमानाची साक्ष देणाऱ्या हालचालींनी राजकीय समीकरणे अक्षरशः ढवळून निघाली आहेत. गुप्त बैठका, अंतर्गत चर्चासत्रे, गटांतर्गत नाराजी, नव्या सेटलमेंट्स आणि पॅनलनिहाय रणनीतींचा धडाका सुरू असून नागरिकांसह सर्व राजकीय वर्तुळात निवडणुकीचा माहोल चांगलाच रंगात आला आहे.
🎯 गुप्त चर्चांचा भडिमार — कोणाचा डाव बसणार? कोणाचा उलटणार?
शहरातील मोठमोठ्या नेत्यांच्या गुप्त बैठकींना उधाण आले असून यातून काही नवीन राजकीय समीकरणे आकार घेत आहेत. नवे राजकीय हातमिळवणीचे प्रयत्न आणि प्रभावशाली मंडळींना आपल्या बाजूला खेचण्याचा सूर सर्व पक्षांत ऐकू येतो आहे.
भाजप, शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस आणी अपक्ष आमने-सामने आल्याने निवडणूक अत्यंत चुरशीची बनली असून अनेक प्रभागांत तिरंगी लढती, तर काही ठिकाणी चौरंगी स्पर्धेचे स्पष्ट चित्र दिसत आहे.
🎯 मतदारांची शांतता उमेदवारांसाठी डोकेदुखी
घराघरांत उमेदवारांचे भेटीगाठी, जाहीर सभा, कॉर्नर सभा अशा विविध माध्यमांनी प्रचारााला वेग आला असला तरी मतदार मोठ्या प्रमाणावर शांत आहेत.
त्यांचा नेमका कल कोणत्या दिशेने आहे याचा ताळमेळ उमेदवार आणि पॅनल प्रमुखांना लागत नसल्याने त्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे पॅनल प्रमुखांनी उमेदवारांना “प्रभागातच ठाण मांडून बसण्याच्या” सूचना दिल्याचे बोलले जात आहे.
🎯 स्थानिक प्रश्न ठरणार निर्णायक
या निवडणुकीत केवळ विकासाच्या गप्पा नव्हे, तर प्रभागनिहाय प्रश्न,
🔺पाणीपुरवठा
🔺रस्त्यांची दुर्दशा
🔺ड्रेनेज
🔺कचरा व्यवस्थापन
🔺स्ट्रीटलाईट
🔺अनधिकृत बांधकामे
🔺आणि स्थानिक सुविधा
यांची सोडवणूक हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा मतदारांच्या चर्चेत आहे.
उमेदवारांची प्रतिमा, त्यांचा स्वभाव, समाजातील स्वीकार, पूर्वीचे काम, मदतशीलता… या सर्व घटकांवर मतदारांचा निर्णय आधारित असेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
🎯 समाजनिहाय व जातीनिहाय मतांचे बदलते गणित
पांढरकवड्यातील राजकीय लढतीत समाजनिहाय आणि जातीनिहाय मते हा देखील महत्त्वाचा घटक बनला आहे.
प्रत्येक पॅनलचे लक्ष आपापल्या प्रभावी मतदारवर्गाला एकत्र आणण्यात असून अनेक प्रभागांत मतांची विभागणी सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत.
ही विभागणी—
➡ कुणाला फायदा देईल?
➡ कुणाला त्याचा फटका बसेल?
हे अद्याप स्पष्ट नाही.
🎯 प्रत्येक तासाला बदलणारी समीकरणे; अंतिम टप्प्यातील उलथापालथीची शक्यता
शहरातील राजकीय चित्र अक्षरशः मिनिटा-मिनिटाला बदलत आहे.
एखाद्या प्रभागात सकाळी एक उमेदवार आघाडीवर असताना, संध्याकाळी त्याच प्रभागात दुसरे समीकरण तयार होताना दिसत आहे.
काही प्रभागांत पॅनलना मोठा धोका निर्माण झाला आहे.
पक्षीय नाराजी, गुप्त डावपेच, अंतर्गत विरोध—हे सर्व घटक मतांच्या आकडेमोडीत मोठा फरक आणू शकतात.
🎯 निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात तापणार वातावरण
सध्या जिथे हालचाली प्रखर आहेत, तिथे पुढील काही दिवसांत आणखी मोठे घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मतदारवर्गाचा कल तोडून पाहण्यासाठी सर्व पॅनलनी सर्वतोपरी प्रयत्न चालवले आहेत.
शहरातील प्रत्येक गल्ली–बोळात निवडणुकीचा ज्वलंत माहोल आहे आणि अंतिम टप्प्यात वातावरण आणखी तापण्याची शक्यता तीव्र आहे.
🎯 एकूण चित्र
पांढरकवडा नगर परिषद निवडणूक 2025 मध्ये—
🔺बदलती राजकीय समीकरणे,
🔺समाजनिहाय मतांची तोडफोड,
🔺तिरंगी–चौरंगी लढती,
🔺गुप्त बैठका,
🔺आणि अंतर्गत नाराजी
यामुळे निवडणूक अत्यंत तापलेली असून कोणत्या पॅनलचे पारडे जड होणार, हे सांगणे सध्या तरी अशक्य होत आहे.
निवडणूक जसजशी अंतिम टप्प्याकडे जाईल, तसतसे हे वातावरण आणखी टोकाला जाणार, अशी चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.








