ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल वणीचा गौरव; मोहित धनेगांवकरची यवतमाळ जिल्हा क्रिकेट संघात निवड

On: December 19, 2025 1:56 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️वणी : प्रतिनिधी


लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल, वणी येथील इयत्ता नववीचा होतकरू विद्यार्थी मोहित चैतन्य धनेगांवकर याची विदर्भ क्रिकेट असोसिएशन (VCA) आयोजित १५ वर्षांखालील ‘भास्कर जोशी मेमोरियल क्रिकेट स्पर्धेसाठी’ यवतमाळ जिल्हा क्रिकेट संघात निवड झाल्याने वणी शहरात आणि शालेय वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल मोहितचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

मोहितला लहानपणापासूनच क्रिकेटची विशेष आवड असून, त्याने सातत्यपूर्ण सराव, कठोर मेहनत, जिद्द आणि खेळाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. वडील चैतन्य धनेगांवकर यांचे प्रोत्साहन तसेच लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलच्या क्रीडा शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळे मोहितची क्रिकेटमधील वाटचाल अधिक भक्कम झाली. शालेय शिक्षण सांभाळत नियमित सराव व शिस्तबद्ध जीवनशैली जपत मोहितने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

विशेष म्हणजे, मागील वर्षीही लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलच्या इयत्ता नववीतील विद्यार्थिनी स्वरा मंगेश करंडे हिची विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या विदर्भ महिला क्रिकेट संघात निवड झाली होती. यामुळे शिक्षणासोबतच क्रीडाक्षेत्रातही गुणवंत खेळाडू घडविणारी संस्था म्हणून लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

मोहितच्या या उज्ज्वल यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष व माजी आमदार श्री. संजीवरेड्डी बोदकुरवार, लायन्स क्लबचे अध्यक्ष तुषार नगरवाला, शाळेचे उपाध्यक्ष बलदेव खुंगर, सचिव सुधीर दामले, कोषाध्यक्ष चंद्रकांत जोबनपुत्रा, संचालक शमिम अहमद, नरेंद्रकुमार बरडीया, किशन चौधरी, महेंद्र श्रीवास्तव, डॉ. के. आर. लाल, रमेश बोहरा, अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे, प्राचार्या चित्रा देशपांडे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मनःपूर्वक अभिनंदन करून मोहितच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

मोहित धनेगांवकरची ही निवड केवळ त्याच्या वैयक्तिक कर्तृत्वाचीच नव्हे, तर वणी शहरासाठी आणि लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलसाठी अभिमानास्पद बाब ठरत असून, भविष्यात तो राज्य व राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

एमएसबीटीई परीक्षेत सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीचे घवघवीत यश; डी. फार्मसीचा निकाल 95 टक्क्यांहून अधिक

वणी उपविभागातील अवैध ट्रक पार्किंगमुळे रस्ते बनले ‘मृत्यूचे सापळे’; ८ दिवसांत कारवाई न झाल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

‘स्मार्ट मीटर’ची सक्ती केल्यास महावितरणला ‘मनसे स्टाईल’ झटका देणार; वणीमध्ये मनसे आक्रमक, उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन!

महावितरणच्या मनमानीविरोधात मनसे आक्रमक; वणीत जीर्ण वीजवाहिन्या व बोर्डा गावाच्या वीजकपातीवर ८ दिवसांचा अल्टिमेटम

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत भव्य वृक्षारोपण मोहीम; शेकडो वृक्षांची लागवड, संगोपनाचाही घेतला संकल्प

टाकळी शिवारात निसर्गाचा कहर! वीज कोसळून मेंढपाळासह १३ शेळ्यांचा जागीच मृत्यू; कुटुंबाचा आधार हिरावला

Leave a Comment