ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

लायन्स स्कूलच्या मुलींची क्रिकेटमध्ये दणदणीत बाजी!

On: October 8, 2026 2:09 PM
Follow Us:
---Advertisement---

⛔जिल्हास्तरीय स्पर्धेत विजेतेपद; अमरावती विभागीय स्पर्धेसाठी संघ पात्र

✍️वणी : महेश टिपले


शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित १७ वर्षांखालील मुलींच्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या संघाने दिमाखदार कामगिरी करत जिल्हा विजेतेपद पटकावले. या शानदार विजयासह लायन्स स्कूलचा संघ अमरावती विभागीय शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

दि. २ ऑक्टोबर रोजी यवतमाळ येथील राणी झाशी मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात लायन्स स्कूलच्या मुलींनी राणी लक्ष्मीबाई विद्यालय, यवतमाळच्या संघाचा तब्बल ९ विकेट्सने पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. सामन्यात लायन्सच्या खेळाडूंनी सांघिक खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघावर सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले.

अंतिम सामन्यात कर्णधार स्वरा करंडे, भाविका हेपट आणि अंजली पांडे यांनी विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

🎯 विजेत्या संघातील खेळाडू

स्वरा करंडे (कर्णधार), भाविका हेपट, अंजली पांडे, मानवी कटारिया, कोमल राजपुरोहित, अनोखी केमेकर, श्रावणी काळे, संबोधी वानखेडे, आराध्या येवले, हर्षदा नित, कंचन गुरनुले, अनुश्री चंद्रगिरीवार, अनन्या राजुलवार, ईशानी हेपट, कुमूद नित आणि मृणाली गोवारदिपे यांचा विजेत्या संघात समावेश होता.

विशेष म्हणजे, लायन्स स्कूलचा संघ दुसऱ्यांदा विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय वाटचालीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपाध्यक्ष बलदेव खुंगर, सचिव सुधीर दामले, कोषाध्यक्ष चंद्रकांत जोबनपुत्रा, संचालक शमीम अहमद, नरेंद्र बरडिया, किशन चौधरी, महेंद्र श्रीवास्तव, डॉ. के. आर. लाल, रमेश बोहरा, लायन्स क्लबचे अध्यक्ष तुषार नगरवाला, अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे, प्राचार्या चित्रा देशपांडे, सुनिता खुसपुरे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.

संघाचे क्रीडा प्रशिक्षक अविनाश ऊईके आणि शिक्षिका नेहा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी मिळविलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आता अमरावती येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेतही लायन्स स्कूलच्या मुली दमदार कामगिरी करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment