ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

विदर्भ तेली महासंघाद्वारे संताजी जगनाडे महाराजांची पुण्यतिथी श्रद्धेने साजरी

On: December 19, 2025 2:05 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️वणी : प्रतिनीधी

विदर्भ तेली महासंघाच्या वतीने येथील संत जगनाडे चौकात संताजी जगनाडे महाराजांची पुण्यतिथी अत्यंत श्रद्धा, भक्ती व सामाजिक एकोप्याच्या वातावरणात साजरी करण्यात आली. समाजसुधारक, संत व प्रेरणादायी विचारवंत असलेल्या संताजी जगनाडे महाराजांच्या कार्याची आठवण करून देत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ तेली महासंघाचे तालुका अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष डंभारे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संताजी जगनाडे महाराजांच्या सामाजिक, धार्मिक व वैचारिक योगदानावर प्रकाश टाकला. अंधश्रद्धा, जातिभेद आणि अन्यायाविरुद्ध लढा देत समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य संताजी जगनाडे महाराजांनी केले, असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमात बोलताना अध्यक्ष संतोष डंभारे यांनी सांगितले की, “संताजी जगनाडे महाराजांचे विचार आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक आहेत. समाजात समता, बंधुता आणि नैतिक मूल्यांची जोपासना करण्यासाठी त्यांच्या विचारांचे आचरण करणे अत्यंत आवश्यक आहे.” समाजाने संघटित राहून शिक्षण, सामाजिक सलोखा व प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

या पुण्यतिथी कार्यक्रमात विदर्भ तेली महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांमध्ये शरद तराळे, विजय पिपराडे, देवेंद्र गोबाडे, शंकर पाटील, गोपाल पाटील, पंढरी बोरपे, गजानन उपाते, विलास डवरे, अजित भटगरे, पंकज कासावार, अंकित पोटदुखे, आकाश भडगरे, श्रीरंग गिरटकर यांचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या शेवटी संताजी जगनाडे महाराजांच्या विचारांवर आधारित प्रेरणादायी संदेश देण्यात आला व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा संकल्प करण्यात आला. शांततामय व अनुशासित वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

एमएसबीटीई परीक्षेत सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीचे घवघवीत यश; डी. फार्मसीचा निकाल 95 टक्क्यांहून अधिक

वणी उपविभागातील अवैध ट्रक पार्किंगमुळे रस्ते बनले ‘मृत्यूचे सापळे’; ८ दिवसांत कारवाई न झाल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

शाळा सुरू होण्यापूर्वी शालेय वाहनांची विशेष फिटनेस तपासणी मोहीम राबवा; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी भाऊ अतुल पांडे यांची मागणी

‘स्मार्ट मीटर’ची सक्ती केल्यास महावितरणला ‘मनसे स्टाईल’ झटका देणार; वणीमध्ये मनसे आक्रमक, उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन!

महावितरणच्या मनमानीविरोधात मनसे आक्रमक; वणीत जीर्ण वीजवाहिन्या व बोर्डा गावाच्या वीजकपातीवर ८ दिवसांचा अल्टिमेटम

जळका शिवारातील अज्ञात मृतदेहाची ओळख पटली; मृतक पांढरकवड्यातील राहुल जोशी

Leave a Comment