ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

वणी नगर परिषदेच्या डीपी रोडवर अतिक्रमणाचा आरोप; माजी कार्यकारी अध्यक्ष पी. के. टोंगे यांची तहसीलदारांकडे तक्रार

On: January 8, 2026 2:56 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️वणी | प्रतिनिधी

वणी नगर परिषदेच्या हद्दीतील डीपी रोडवर अतिक्रमण होत असून नगर परिषदेचे मुख्याधिकारी याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत आहेत, असा गंभीर आरोप करत नगरपालिकेचे माजी कार्यकारी अध्यक्ष पी. के. टोंगे यांनी तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदनाची प्रत पाठविण्यात आली असून, कारवाईबाबत शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

तक्रारीनुसार, नगर परिषद हद्दीतील शेत सर्वे नंबर १०३/१ मध्ये सुमारे २० ते २५ वर्षांपूर्वी मंजूर झालेला ले-आऊट आहे. या ले-आऊटसमोरच आठवडी बाजार ते चंद्रपूर हायवेला जोडणारा सुमारे १८ मीटर रुंदीचा डीपी रोड नियोजनानुसार अस्तित्वात आहे. मात्र, संबंधित रस्त्याच्या रुंदीमध्ये अतिक्रमण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

माजी कार्यकारी अध्यक्ष टोंगे यांच्या म्हणण्यानुसार, भूमी अभिलेख विभाग, वणी यांच्या नोंदीनुसार १८ मीटर रुंदीचा असलेल्या या रस्त्यावर ले-आऊटधारक विलास कोंडावार यांनी १५ बाय ३०० फूट मोकळी जागा दाखवून विक्री केल्याचा संशय आहे. यामुळे सार्वजनिक रस्त्याची रुंदी कमी होण्याची भीती असून, भविष्यात वाहतूक कोंडीसह नागरी सुविधा बाधित होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

या प्रकरणात नगर परिषदेच्या प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन वस्तुनिष्ठ चौकशी करावी, अतिक्रमण असल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी टोंगे यांनी निवेदनातून केली आहे. दरम्यान, या तक्रारीवर प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे संपूर्ण वणी शहराचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

अयोध्या श्रीराम मंदिर देणगी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा; वणीत रामरक्षा आंदोलन व महाआरतीतून रामभक्तांची मागणी

राजूरमधील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर; वेकोली प्रशासन व ठेकेदाराला २४ तासांचा अल्टिमेटम

बोगस सोयाबीन बियाण्यांविरोधात मनसे आक्रमक; फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वात कृषी विभागाला निवेदन, कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

वणीतील MHT-CET तयारीसाठी विद्यार्थी व पालकांची पहिली पसंती –   क्रिष्णा मास्टर्स अकॅडमी,

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला वणीत तीव्र विरोध; प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्याची संविधान जागर सन्मान मंच, वणीची  मुख्यमंत्र्याकडे मागणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला यश; 15 दिवसांत समितीचा अहवाल, जमीन संपादनावर सकारात्मक निर्णयाचे WCL प्रशासनाचे आश्वासन

Leave a Comment