ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

प्रभाग क्र. १३ मध्ये स्ट्रीट लाईटचे खांब धोकादायक; नाल्या तुंबल्या – नगरसेवक सैफुर मोबीन रहेमान यांचे नगर परिषदेला निवेदन

On: January 14, 2026 3:53 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️वणी | प्रतिनिधी

शहरातील प्रभाग क्र. १३ मधील मूलभूत नागरी सुविधांची दयनीय अवस्था लक्षात घेता नगरसेवक सैफुर मोबीन रहेमान यांनी नगर परिषद वणीच्या अध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्याकडे सविस्तर लेखी निवेदन सादर करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
प्रभागातील अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईटचे विद्युत पोल वाकलेले, कुजलेले असून काही ठिकाणी दिवे पूर्णतः बंद आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. रात्रीच्या वेळी अपघात, चोरी, महिलांची गैरसोय अशा अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

⚠️ धोकादायक ठरलेले वाकलेले पोल:
केबी-४१ – आंबेडकर भवन जवळ, रंगनाथ नगर
पी-१२५१ – आंबेडकर भवन जवळ, रंगनाथ नगर
एमबी-१२५ – बदखल यांच्या घराजवळ, शास्त्री नगर

⚠️ कुजलेले (जुनाट) पोल:
पी-१०१९ – राजीकभाई यांच्या घराजवळ, शास्त्रीनगर
बी-११४८ – मुरस्कर यांच्या घराजवळ, शास्त्रीनगर
 स्ट्रीट लाईट पूर्णतः बंद असलेली ठिकाणे:
पी-१२५४ – आकाश नागतूरे यांच्या घराजवळ, रंगनाथ नगर
मिनाज शेख यांच्या घराजवळ, रंगनाथ नगर

नवीन स्ट्रीट लाईट बसविण्याची मागणी:
बीडी४बीडी – अनिल आसुटकर यांच्या घराजवळ (फोटो स्टुडिओ परिसर)
नगरसेवक रहेमान यांनी स्पष्ट शब्दांत नमूद केले आहे की, या सर्व बाबींकडे नगर परिषद प्रशासनाने गांभीर्याने पाहून तातडीने दुरुस्ती, बदल व नवीन खांब बसविण्याची कार्यवाही करावी.

🎯 नाल्या व चेंबर तुंबल्याने नागरिक त्रस्त – त्वरित सफाईची मागणी
याशिवाय, प्रभागातील नाल्या व चेंबर ठिकठिकाणी तुंबून सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि आरोग्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. या संदर्भातही नगरसेवकांनी स्वतंत्र निवेदन सादर केले.

✍️ नाली व चेंबर सफाई आवश्यक असलेली ठिकाणे:
🔺प्रल्हाद बरडे यांच्या घरापासून नईमभाई यांच्या घरापर्यंत
🔺बालू गोहोकार ते सोहेब चुनेवाले यांच्यापर्यंत
🔺गौतम झाडे ते ठोंबरे यांच्या घरापर्यंत
🔺रवि चांदेकर ते पेरगे गुरुजी यांच्या घरापर्यंत
🔺संदीप मुत्यलवार यांच्या घरासमोरील कोडनावाडी – येथे नालीमध्ये झाडे-झुडपे वाढल्याने प्रवाह अडलेला
अनिता चटप ते मनोज उरकुडे यांच्या घरापर्यंत
🔺यासोबतच, संपूर्ण प्रभागातील नाल्यांची नियमित साफसफाई, चेंबरची देखभाल तसेच दररोज झाडू मारण्याची (स्वच्छता) व्यवस्था सुरू करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

🎯 “नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड होऊ देणार नाही” – सैफुर मोबीन रहेमान
या संदर्भात बोलताना नगरसेवक सैफुर मोबीन रहेमान म्हणाले की,
“प्रभागातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित राहू नयेत यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. स्ट्रीट लाईट, स्वच्छता, नाली सफाई या प्राथमिक सुविधा असून त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी अन्यथा लोकहितासाठी पुढील पाऊल उचलावे लागेल.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

वणीत तिथीनुसार शिवजयंतीचा ऐतिहासिक जल्लोष; मनसेकडून भव्य तयारी, गड-किल्ल्यांच्या प्रतिकृतींसह लेझर शोने रंगणार शिवकाल

वणीत ‘अपर जिल्हाधिकारी’ तर शिरपूरला ‘अपर तहसील’ कार्यालयाची जोरदार मागणी; मनसे नेते राजू उंबरकर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेची ज्योत मालवली श्रीमती सुमन गौतम मानकर यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी दुःखद निधन

गुणवत्तेचा कापूस नाकारल्याने शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; मनसे पदाधिकाऱ्यांच्या सतर्कतेने अनर्थ टळला — वणी बाजार समितीतील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

शिवगर्जनेत दुमदुमले लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल; विद्यार्थ्यांच्या दमदार सादरीकरणांनी रंगली शिवजयंती

धुलिवंदना निमित्त वणीमध्ये रंगणार भव्य हास्य कवी संमेलन; देशभरातील नामांकित कवींची उपस्थिती

Leave a Comment