ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

नगर परिषदेच्या ट्यूबवेलचा खासगी वापर? वणीतील प्रभाग क्रमांक १२ मध्ये गंभीर प्रकार उघडकीस, चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी : भीम आर्मीचे निवेदन

On: January 15, 2026 3:36 AM
Follow Us:
---Advertisement---


✍️वणी | प्रतिनिधी

वणी शहरातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये नगर परिषदेच्या मालकीच्या ट्यूबवेलचा जनतेसाठी असलेला पाणीपुरवठा थांबवून त्या पाण्याचा खासगी वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भीम आर्मी, भारत एकता मिशनच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

भीम आर्मी, भारत एकता मिशनचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली वणी विधानसभा अध्यक्ष रविंद्र उर्फ बबलूभाऊ मेश्राम, तालुकाध्यक्ष हरीश पाते यांच्या  नेतृत्वात आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगराध्यक्षांना हे निवेदन सादर करण्यात आले.

🎯 तीन वर्षांपासून पाणीपुरवठा बंद
निवेदनात नमूद केल्यानुसार, वणी नगर परिषदेच्या हद्दीत मोक्षधामच्या मागील बाजूस असलेल्या नगर परिषदेच्या ट्यूबवेलद्वारे पूर्वी सेवानगर परिसर तसेच मोक्षधाम समोरील बरडपूरा भागातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत होता. मात्र मागील सुमारे तीन वर्षांपासून हा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

🎯 पाणी जनतेऐवजी खासगी वापरासाठी?
आरोपानुसार, ट्यूबवेलमधील पाणी जनतेला न देता ते मोक्षधामलगतच्या खासगी जमिनीवर वापरले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, हा प्रकार नगर परिषद प्रशासनाच्या माहितीत असूनही दुर्लक्षित केला जात आहे का? की संबंधित कंत्राटदाराच्या संगनमताने हा प्रकार सुरू आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

🎯 चौकशी आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी
भीम आर्मी, भारत एकता मिशनच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात पुढील मागण्या केल्या आहेत —
🔺ट्यूबवेल कनेक्शन वळविणाऱ्या व्यक्ती/संस्थेची तातडीने चौकशी करावी
🔺दोषींवर गुन्हा दाखल करावा
🔺आजपर्यंतचा वीज वापर आणि पाणीकराची वसुली करावी
🔺संबंधित पाणीपुरवठा कंत्राटदारावरही कठोर कारवाई करावी
🔺नागरिकांचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करावा

🎯 नागरिकांमध्ये संताप
या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशाराही काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून दिला जात आहे.
निवेदनावर वणी विधानसभा अध्यक्ष रविंद्र उर्फ बबलूभाऊ मेश्राम तसेच वणी तालुका अध्यक्ष हरीश पाते, आकाश उईके, शिवेंद्र ब्राह्मणकर, मंगेश सोनोने, हरिदास गेडाम  यांच्या सह्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

माता रमाई आंबेडकर यांची १२८ वी जयंती वणीत उत्साहात साजरी, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाचा उपक्रम

कर्तव्यावर परतताना देशाने गमावला एक वीर जवान, केळापूर तालुक्यातील CRPF जवान विनोद पुसनाके यांचे अपघाती निधन

अबॅकस स्पर्धेत वणीच्या विद्यार्थ्यांचा दबदबा; 20 ट्रॉफींसह ‘बेस्ट स्टुडंट’ व ‘बेस्ट टीचर’ पुरस्कारावर वणीची मोहोर

घोंन्सा कोळसा खाण परिसरात भीषण अपघात; पुलाच्या अपुऱ्या सुरक्षेमुळे सुरक्षा रक्षकाचा खोल खड्ड्यात पडून मृत्यू

नकलांनी प्रेक्षक हसून-हसून लोटपोट; लोककला लोकाश्रयावरच जिवंत राहणार – डॉ. दिलीप अलोने

लोहार समाजाची प्रभू श्री विश्वकर्मा जयंती वणीत हर्षोल्लासात साजरी तिरूपती मंगल कार्यालयात समाजबांधवांची मोठी उपस्थिती;

Leave a Comment