ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, संस्कार व नेतृत्वगुण रुजविण्यावर भर

On: January 15, 2026 9:03 AM
Follow Us:
---Advertisement---


✍️वणी : प्रतिनिधी

लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल, रविनगर येथे दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त विशेष अभिवादन व प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, चारित्र्यनिर्मिती, नैतिक मूल्ये आणि थोर व्यक्तिमत्त्वांच्या विचारांचे संस्कार रुजविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे अकॅडेमिक डायरेक्टर व प्राचार्य प्रशांत गोडे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन केले. आपल्या प्रेरणादायी मनोगतात त्यांनी राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्व घडणीत दिलेले संस्कार, त्याग आणि आदर्श मातृत्व यावर प्रकाश टाकला. तसेच स्वामी विवेकानंद यांनी युवकांना दिलेला आत्मविश्वासाचा संदेश, राष्ट्रनिर्मितीची दृष्टी आणि “उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका” हा विचार आजच्या पिढीसाठी किती महत्त्वाचा आहे, हेही त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रभावी भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. देवांश जुनगरे व आरोही कळसकर यांनी अनुक्रमे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत साकार रूप धारण करून आपले मनोगत मांडले, ज्यामुळे कार्यक्रम अधिक जिवंत व भावस्पर्शी ठरला.

तसेच अभीर सरमोकद्द्म याने राजमाता जिजाऊ यांच्यावर आधारित पोवाडा सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. या सादरीकरणास उपस्थित शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांकडून विशेष दाद मिळाली.

कार्यक्रमास शाळेतील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, नैतिक मूल्ये, आत्मविश्वास व नेतृत्वगुण वृद्धिंगत होतात, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमाचे सुंदर व प्रभावी संचालन अनया दुमोरे व नैतिक ढुमणे यांनी केले, तर स्वरा उईके हिने आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, थोर व्यक्तिमत्त्वांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन जीवनात सकारात्मक वाटचाल करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

एमएसबीटीई परीक्षेत सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीचे घवघवीत यश; डी. फार्मसीचा निकाल 95 टक्क्यांहून अधिक

वणी उपविभागातील अवैध ट्रक पार्किंगमुळे रस्ते बनले ‘मृत्यूचे सापळे’; ८ दिवसांत कारवाई न झाल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

‘स्मार्ट मीटर’ची सक्ती केल्यास महावितरणला ‘मनसे स्टाईल’ झटका देणार; वणीमध्ये मनसे आक्रमक, उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन!

महावितरणच्या मनमानीविरोधात मनसे आक्रमक; वणीत जीर्ण वीजवाहिन्या व बोर्डा गावाच्या वीजकपातीवर ८ दिवसांचा अल्टिमेटम

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत भव्य वृक्षारोपण मोहीम; शेकडो वृक्षांची लागवड, संगोपनाचाही घेतला संकल्प

टाकळी शिवारात निसर्गाचा कहर! वीज कोसळून मेंढपाळासह १३ शेळ्यांचा जागीच मृत्यू; कुटुंबाचा आधार हिरावला

Leave a Comment