ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

सुवर्ण यशाचा गौरव : वणी वकील संघाकडून ॲड. ट्विंकल गोहणे यांचा भव्य सत्कारगोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सुवर्णपदकाने सन्मानित

On: January 23, 2026 2:16 PM
Follow Us:
---Advertisement---

⛔ गुणवंतांचा गौरव नवोदितांना प्रेरणादायी – ॲड. वीरेंद्र महाजन


✍️ वणी : प्रतिनिधी
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या बी.ए.एल.एल.बी. परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून सुवर्णपदक पटकावणाऱ्या ॲड. ट्विंकल गोहणे यांचा वणी वकील संघाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या विद्यापीठाच्या १३व्या दीक्षांत समारंभात मान्यवरांच्या हस्ते त्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले होते. या उल्लेखनीय यशाच्या पार्श्वभूमीवर वणी बार रूममध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

कु. ट्विंकल सुधाकर गोहणे या वणी तालुक्यातील केसुर्ली या छोट्याशा गावातील एका शेतकरी कुटुंबातून आलेल्या होतकरू कन्या आहेत. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले असतानाही आईच्या कष्टाला साथ देत त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले. कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी बी.ए.एल.एल.बी. अभ्यासक्रमात विशेष कामगिरी करत हिंदू कायदा (Hindu Law) या विषयात प्राविण्य मिळवून गोंडवाना विद्यापीठात सुवर्णपदक प्राप्त केले. सध्या त्या वणी दिवाणी व फौजदारी न्यायालयात ॲड. अविनाश बोधाने यांच्याकडे सहायक अधिवक्ता म्हणून कार्यरत आहेत.

या सत्कार समारंभात वणी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. वीरेंद्र महाजन अध्यक्षस्थानी होते. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की,
“वणी वकील संघात नव्याने दाखल होणाऱ्या तरुण वकिलांना प्रोत्साहन देणे ही आमची सातत्याची भूमिका आहे. ॲड. ट्विंकल गोहणे यांनी सुवर्णपदक प्राप्त करून वणी बारचा मान उंचावला आहे. गुणवंतांचा गौरव केल्याने नवोदितांना प्रेरणा मिळते आणि त्यांनी अधिक उत्कृष्ट कार्य करावे, अशी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.”
कार्यक्रमात ॲड. अविनाश बोधाने व ॲड. नीलेश चौधरी यांनीही आपले मनोगत व्यक्त करत ॲड. ट्विंकल यांच्या मेहनतीचे व यशाचे कौतुक केले. यावेळी स्वतः ॲड. ट्विंकल गोहणे यांनी सत्काराला उत्तर देताना आपल्या यशामागे आईचे कष्ट, गुरुजनांचे मार्गदर्शन आणि सहकाऱ्यांचा पाठिंबा असल्याचे भावनिक शब्दांत सांगितले.

या सत्कार कार्यक्रमाचे संचालन वकील संघाचे सचिव ॲड. अमोल टोंगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ॲड. दिलीप परचाके यांनी मानले. कार्यक्रमास वणी बार रूममध्ये वणी दिवाणी व फौजदारी न्यायालयातील महिला व पुरुष वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा सत्कार केवळ एका यशाचा गौरव नसून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरला असून, कष्ट, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर कोणतेही शिखर गाठता येते, हेच ॲड. ट्विंकल गोहणे यांच्या यशाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

एमएसबीटीई परीक्षेत सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीचे घवघवीत यश; डी. फार्मसीचा निकाल 95 टक्क्यांहून अधिक

वणी उपविभागातील अवैध ट्रक पार्किंगमुळे रस्ते बनले ‘मृत्यूचे सापळे’; ८ दिवसांत कारवाई न झाल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

‘स्मार्ट मीटर’ची सक्ती केल्यास महावितरणला ‘मनसे स्टाईल’ झटका देणार; वणीमध्ये मनसे आक्रमक, उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन!

महावितरणच्या मनमानीविरोधात मनसे आक्रमक; वणीत जीर्ण वीजवाहिन्या व बोर्डा गावाच्या वीजकपातीवर ८ दिवसांचा अल्टिमेटम

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत भव्य वृक्षारोपण मोहीम; शेकडो वृक्षांची लागवड, संगोपनाचाही घेतला संकल्प

टाकळी शिवारात निसर्गाचा कहर! वीज कोसळून मेंढपाळासह १३ शेळ्यांचा जागीच मृत्यू; कुटुंबाचा आधार हिरावला

Leave a Comment