ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

५० किमी स्केटिंग करत मनस्वी पिंपरेचा ऐतिहासिक पराक्रम वणीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद; ग्रिनीज विक्रमप्राप्त चिमुकलीची आणखी एक झेप

On: January 25, 2026 2:57 AM
Follow Us:
---Advertisement---


✍️वणी / प्रतिनिधी :


वणीच्या क्रीडा आणि सामाजिक इतिहासात आजचा दिवस कायमचा अजरामर ठरला आहे. आपल्या मातीतील जिद्दी, मेहनती आणि असामान्य क्षमतेच्या कुमारी मनस्वी विशाल पिंपरे (रा. बोटोणी, ता. मारेगाव) हिने पांढरकवडा ते वणी हे तब्बल ५० किलोमीटरचे अंतर स्केटिंग करत यशस्वीपणे पूर्ण करून एक नवा इतिहास घडवला आहे. अत्यंत कमी वयात हा कठीण पराक्रम साध्य करत मनस्वीने नाव राज्यासह देशपातळीवर उज्वल केले आहे.

यापूर्वीच  ग्रिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करून जागतिक पातळीवर आपली ओळख निर्माण करणाऱ्या मनस्वीने या विक्रमाद्वारे पुन्हा एकदा आपली जिद्द, शारीरिक क्षमता आणि मानसिक ताकद सिद्ध केली आहे. एका छोट्याशा वयातील मुलीने दाखवलेली ही चिकाटी केवळ कौतुकास्पद नसून, आजच्या आणि उद्याच्या पिढीसाठी ती एक प्रेरणादायी आदर्श ठरली आहे.

मनस्वीच्या चाकांच्या वेगासोबत संपूर्ण वणीची अस्मिता, अभिमान आणि स्वप्नेही धाव घेत असल्याचे चित्र या प्रवासात पाहायला मिळाले. अवघड रस्ते, लांब अंतर आणि शारीरिक थकवा यावर मात करत तिने हा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला.

🎯 भव्य स्वागत आणि गौरव सोहळा
या ऐतिहासिक यशाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वणी शहरातील छत्रपती चौकात भव्य दिव्य स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. फटाक्यांच्या आतषबाजीत, ढोल-ताशांच्या गजरात आणि वणीकरांच्या अलोट गर्दीत मनस्वीचे जंगी स्वागत करण्यात आले. संपूर्ण परिसर ‘मनस्वी पिंपरे जिंदाबाद’च्या घोषणांनी दुमदुमून गेला.

यावेळी मनसे नेते राजू उंबरकर यांच्या हस्ते मनस्वीला शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. तसेच मनस्वीचे पालक आणि तिला घडवणारे प्रशिक्षक विजय महल यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना राजू उंबरकर म्हणाले, “मनस्वीने अत्यंत कमी वयात यशाचे उत्तुंग शिखर गाठले आहे. भविष्यात तिला या क्षेत्रात कोणतीही अडचण आल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील.”

🎯 १५० हून अधिक पदकांची मालकीण
मनस्वी पिंपरे हिने आतापर्यंत राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर १५० हून अधिक पदके व पुरस्कार पटकावले आहेत. तिच्या यशाचा आलेख सातत्याने उंचावत आहे. यापूर्वी २३ जानेवारी २०२४ रोजी तिने बोटोणी ते वणी हे ३० किलोमीटरचे अंतर स्केटिंगद्वारे पार केले होते, त्यावेळीही तिचा भव्य सत्कार करण्यात आला होता. आजचा ५० किमीचा पराक्रम हा तिच्या त्या यशाचा पुढचा मोठा टप्पा मानला जात आहे.

🎯 मान्यवरांची उपस्थिती
या गौरव सोहळ्यास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुक्केवार, नगर परिषदेचे सभापती तथा रोटरी क्लबचे अध्यक्ष लवलेश लाल, नवनियुक्त सभापती अनिल चिंडालिया, माजी तहसीलदार अरुण कावलकर, अनिल उत्तरवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच मनसे वाहतूक सेनेचे इरशाद खान, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश पेचे, तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, गोविंदराव थेरे, व्यापारी सेना शहराध्यक्ष राकेश वैद्य, निखिल केडिया, अचल जोबनपुत्रा तसेच नॅशनल चॅम्पियन वैभवी मसराम यांची उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणारी ठरली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय पारखी यांनी प्रभावीपणे केले तर आभारप्रदर्शन फाल्गुन गोहोकार यांनी मानले.

🎯 वणीकरांचा अभिमान
मनस्वीच्या या गगनभरारी यशामुळे संपूर्ण वणी शहरात अभिमानाचे वातावरण असून, कर्तृत्वाला वणीची जनता नेहमीच डोक्यावर घेते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मनस्वी पिंपरेच्या या ऐतिहासिक पराक्रमाचा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटत असून, भविष्यात ती देशाचे नाव जागतिक पातळीवर आणखी उज्वल करेल, असा विश्वास सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

वणीत तिथीनुसार शिवजयंतीचा ऐतिहासिक जल्लोष; मनसेकडून भव्य तयारी, गड-किल्ल्यांच्या प्रतिकृतींसह लेझर शोने रंगणार शिवकाल

वणीत ‘अपर जिल्हाधिकारी’ तर शिरपूरला ‘अपर तहसील’ कार्यालयाची जोरदार मागणी; मनसे नेते राजू उंबरकर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेची ज्योत मालवली श्रीमती सुमन गौतम मानकर यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी दुःखद निधन

गुणवत्तेचा कापूस नाकारल्याने शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; मनसे पदाधिकाऱ्यांच्या सतर्कतेने अनर्थ टळला — वणी बाजार समितीतील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

शिवगर्जनेत दुमदुमले लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल; विद्यार्थ्यांच्या दमदार सादरीकरणांनी रंगली शिवजयंती

धुलिवंदना निमित्त वणीमध्ये रंगणार भव्य हास्य कवी संमेलन; देशभरातील नामांकित कवींची उपस्थिती

Leave a Comment